🟥 जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा “रडीचा डाव”
🟥 ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावांमधून दहा ठेकेदारांना संशयास्पदरित्या वगळले?
🟥 अधिकारी व ठेकेदार भ्रष्ट युतीचा मनसेच्या प्रसाद गावडेंकडून पर्दाफाश..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ, दि-०२:- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा कारभार मागील काही कालावधीपासून संशयास्पद व भ्रष्ट असल्याचे विविध प्रकरणांमधून समोर आले आहे. मर्जीतील ठेकेदारांना कामवाटप करण्यासाठी शाळांच्या निविदा प्रक्रियेस उशीर करणे, मर्जीतील ठेकेदारांसाठी विकास कामांची अंदाजपत्रके अनावश्यक पद्धतीने फुगवून शासन निधीचा अपहार करणे अशा बाबी ताज्या असतानाच आता जि.प. बांधकामचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.वेळेत कामे पूर्ण न करता अर्धवट कामे टाकणाऱ्या 21 ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. तत्कालीन बांधकाम विभागातील दोन लिपिकांनी कारवाईची नस्ती प्रलंबित ठेवल्यामुळे संबंधित लिपिकांना सेवेतून निलंबित देखील करण्यात आले होते. मात्र त्याकाळी यादीत टाकण्याच्या कारवाईचे पुढे काय झाले याचा थांग पत्ता सहा ते सात महिने लागत नसताना आज रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्यातील दहा कंत्राटदारांना संशयास्पद पद्धतीने कारवाईतून वगळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषद बांधकामच्या तत्कालीन अधिकाऱ्याने फक्त “त्या” दहा जणांना एक वेळ संधी देण्यासाठी कारवाईतून वगळण्यामागे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद प्रशासनातील काळ्या यादीत टाकणे कारवाईबाबतची नस्ती प्रलंबित ठेवल्याने दोघा लिपिकांवर कारवाई होते, त्यांची एक पगारवाढ देखील थांबवली जाते मग ज्या नियामधीन कारवाईच्या अट्टहासाठी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली गेली ती कारवाई सहा ते सात महिने का दडपली गेली याची प्रचिती आता समोर आली आहे. कारवाईचा आव आणून ठेकेदारांकडून मलई गोळा करणे हाच उद्देश बांधकाम विभागाचा होता अशी चर्चा ठेकेदारांकडूनच संपूर्ण जिल्हा परिषदेत चालवली जात आहे. कर्मचाऱ्यांना एक न्याय व ठेकेदारांना दुसरा ही बाब जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी अत्यंत लाजिरवाणी असून यामुळे जिल्हा परिषद कारभाराबाबत चुकीचा संदेश जिल्ह्यातील जनतेत पसरला गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री पालकमंत्री म्हणून कारभार हाकणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाप्रकारे ठेकेदार लॉबी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर वरचढ ठरून दबावातुन हा प्रकार झाला की भ्रष्टाचारातून याची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मनमानी व भोंगळ कारभाराचा फटका जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना याआधी बसलेलाच आहे; याशिवाय प्रशासकीय इमारत छपराचे काम करणाऱ्या एका कष्टकरी गरीब कामगाराला देखील प्राणास मुकावे लागले आहे. अधिकारी पालकमंत्र्यांना जुमानत नाहीत अशी सुप्त चर्चा सत्ताधारी कार्यकर्त्यांमध्येच रंगली असून या सगळ्याची दखल घेत पालकमंत्री जिल्हा नियोजन आढावा बैठकीत दिलेल्या कारवाई बाबतच्या सुचनेनुसार खरंच कारवाई करतात की नुसती “बोलाचीच कढी अन बोलाचाच भात” याप्रमाणे वेळ मारून नेतात हे पाहणे औत्सुक्याचे असून “आंधळ दळतय अन कुत्र पीठ खातय” असा जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा चाललेल्या भोंगळ कारभाराला पालकमंत्री चाप लावणार का असा सवाल मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी उपस्थित केला आहे.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

