कोकणरत्नागिरीराजकीयसामाजिक

माझ्या विजयामध्ये कोसूंब जि.प. गटातील मतदारांचा सिंहाचा वाटा; आमदार शेखर निकम

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.०४: चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांचा कोसुंब जिल्हा परिषद गटातील आंबवली, फणसट, देवधामापूर, सांगवे, नांदळज, उजगाव, या गावामध्ये विविध खात्यांच्या अधिकाऱ्यासह गावभेट कार्यक्रम मोठया उत्साहामध्ये संपन्न झाला. या दौऱ्यामध्ये वरिल सर्व गावातील ग्रामस्थांच्या विविध खात्यातील समस्या जाणून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमांतर्गत करण्यात आला आहे. तसेच काही प्रश्न संबधित अधिकाऱ्याना तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या . आमदार शेखर निकम यांनी आपल्या गावभेट दौऱ्याप्रसंगी कोसुंब जिल्हा परिषद गटातून गावभेट दौरा चालू करीत आहेत, याचे कारण मी निवडून आल्यानंतर कोरोना सारख्या महामारी आली आणि आपला सर्व संपर्क तुटला; परंतु मी या कालावधीत सुध्दा कोरोना बाबत असलेल्या मतदार संघातील वैदयकिय समस्या व रुग्णांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु गेले आठ ते नऊ महिने आपल्याला भेटून आपल्या अडीअडचणी सोडविण्याच्या तीव्र इच्छा असून सुध्दा येता आले नाही, याची खंत व्यक्त केली.

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील व आपल्या गावातील तुम्ही सूचित केलेल्या विकारस कामांच्या निधीची पुर्तता करण्यासाठी मी कटिबध्द आहे. कोरोना सारख्या महामारीमध्ये सुध्दा शासनाच्या माध्यमातून विविध योजनेअंतर्गत निधी उपलब्ध केला आहे. त्यामध्ये बजेट मधून अंदाजे ४० कोटी , २५ / १५ योजने अंतर्गत ८ कोटी, समाजकल्याण योजने अंतर्गत ५ कोटी तसेच ३०-५४ मधून १ कोटी निधी उपलब्ध झाला आहे.आपल्या गावातील काही कामांचा समावेश आहेच व उर्वरीत कामांसाठी निधी देवून ती लवकरात लवकर पुर्ण करण्याची माझी जबाबदारी आहे. त्याची चिंता करु नका. कोविड -१९ च्या कालावधी मध्ये आपापल्या गावामध्ये सरपंच, ग्राम कृती दल, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशाताई, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. यापुढेही योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन केले. या गावभेट कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते सुरेश बने, पंचायत समिती सदस्य सौ. सारिका जाधव, माधुरी सालिम राजेद्र सुर्वे, हनिफ हरचीरकर, दिलीप बोथले, प्रफुल्ल बाईत, पंकज पुसाळकर, बाळू ढवळे, अमित जाधव, अस्लम धामणस्कर, सिताराम आग्रे, पप्पू गोवळकर, संजय शेलार, प्रफुल्ल भुवड, नितिन भोसले, गटविकास अधिकारी रेवंडकर, महावितरणचे मंदार ताटके, बांधकाम विभागाचे आर.एस. जाधव, पाणी पुरवठा चे प्रशांत पवार, कृषि विभागाचे प्रकाश डोगरे, विस्तार अधिकारी पारसे, जाधव, पाटील, मोहिते आदि अधिकारी व गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला, बहुसंखेने उपस्थित होते.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!