🟥 नवीन शिक्षक भरतीत स्थानिकांनाच प्राधान्य..
🟥 उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती ; रुजू झाल्यानंतर पुढील १० वर्ष बदली नाही
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴रत्नागिरी, दि-३०:- नवीन होवू घातलेल्या शिक्षक भरती संदर्भात आता स्थानिक उमेदवारांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही जिल्ह्यात एकदा शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर पुढे १० वर्ष कोणतीही सबब न देता आपले काम करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता या शिक्षक भरतीमध्ये जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारालाच संधी मिळण्याची शक्यता आता वाढली आहे. येत्या एक ते दीड महिन्यातच ही भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
राज्यभरात शिक्षकांची असलेली कमतरता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होणारे परिणाम यामुळे शिक्षक भरती हा आता गंभीर विषय बनला आहे. तसेच जिल्ह्यात शिक्षकांच्या बदलीमुळे गाजणारे राजकारण हा तर सर्व जिल्ह्यातील शिक्षण विभागांसाठी डोकेदुखी ठरणारा विषय आहे. अनेक ठिकाणी शिक्षक भरतीनंतर परजिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना मात्र या संधीपासून लांब रहावे लागते व काही महिन्यातच भरती झालेला शिक्षक आपल्या मूळ जिल्ह्यात बदली मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करु लागतो आणि भरती झालेली शिक्षकांची जागा मात्र रिक्त राहते. यामुळे अनेक शाळा या शिक्षकाविना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन राज्य शासनाने आता शिक्षक भरतीसंदर्भात काही नवीन नियम लावले आहेत. आता होवू घातलेल्या शिक्षक भरतीत एकदा भरती झालेला शिक्षक पुढील १० वर्ष दुसऱ्या जिल्ह्यात बदली करून जावू शकत नाही.
गंभीर आजारपण तसेच पती व पत्नी याचे नोकरीचे ठिकाण आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर समस्या अशा काही निवडक आणि अतिमहत्त्वपूर्ण कारणांची शहानिशा केल्यानंतरच बदलीचा प्रस्ताव मंजूर केला जाणार आहे. शासनाच्या या अटीमुळे आता परजिल्ह्यातून येणारे व रुजू झाल्यानंतर लगेच बदली मागणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

