कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥 सिंधुदूर्ग जिल्हा बँकेने गाठला 5000 कोटी व्यवसायाचा टप्पा…!

🟥 अध्यक्ष मनीष दळवी यांनी मानले सर्वांचे आभार..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-२९:- राज्यात अग्रगण्य जिल्हा बँक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने गुरुवारी २७ जुलैला ५ हजार कोटींचा व्यवसाय टप्पा गाठून सहकार क्षेत्रात इतिहास रचला आहे. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वखाली बँकेने हा व्यवसायाचा टप्पा गाठल्याने सहकार क्षेत्राबरोबरच सर्व स्तरातून जिल्हा बँकेच्या या घोडदौडचे कौतुक होत आहे.

सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या जिल्हयामध्ये ९८ शाखा कार्यरत आहेत. बँकेमार्फत नियमित बँकिंग सेवांसह RTGS/NEFT, ATM, Mobile App, IMPS, UPI, E-Com, QR-Code, ABPS, BBPS, CTS, Micro ATM Door Step Banking, E-Mail Account Statement इत्यादी आधुनिक बँकिंग सुविधा पुरविण्यात येत आहेत. जिल्हा बँकेने ४ दशकांची वाटचाल पूर्ण केली असून २७ जुलै, २०२३ रोजी बँकेने रू.५००० कोटी व्यवसायाचा टप्पा गाठलेला आहे. व्यवसायाचा हा पल्ला गाठण्यामध्ये बँकेच्या सभासद संस्था, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व जिल्हावासियांचा मोठा वाटा राहिलाअसल्याने याबद्दल बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी या सर्वांप्रती आभार व्यक्त केले आहेत.

बँकेने गाठलेला रू.५००० कोटी व्यवसायाचा टप्पा व बँकेची रविवार ३०/०७/२०२३ रोजी होत असलेल्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी बँकेच्या ३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्ष अखेरील कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. सदर वर्षामध्ये बँकेस रू. ३२०.९८ कोटींच्या नविन ठेवी प्राप्त होवून बँकेच्या एकूण ठेवी रु. २६०२.९२ कोटी एवढ्या झालेल्या आहेत. ठेवींच्या वाढीचे प्रमाण ७.३९% राहिल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा बँकांकडील ठेव वाढीचा वेग विचारात घेता, गतवर्षीच्या ठेव वाढीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापूर व सातारा जिल्हा बँकांनंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. बँकेच्या कर्जव्यवहारामध्ये रू.२०१.०२ कोटींची वाढ होवून एकूण कर्जे रु.२२३५.१७ कोटी एवढी झाली आहेत. बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये रू.३८०.१८ कोटी भरीव वाढ झालेली आहे. बँकेच्या एकूण निधीमध्ये रू.७२.३७ कोटी एवढी वाढ होवून एकूण निधी ३५५.९२ कोटी एवढे झालेले आहेत. चालू वर्षी बँकेस ढोबळ नफा रु.९०.७२ कोटी एवढा झालेला असून आवश्यक सर्व तरतूदी केल्यानंतर बँकेचा निव्वळ नफा रू.२०.२१ कोटी एवढा आहे. चालू वर्षी बँकेच्या ढोबळ एनपीएच्या प्रमाणामध्ये १.१७% एवढी घट झाली असून बँकेच्या ढोबळ एनपीए चे प्रमाण ३.५६% तर निव्वळ एनपीएचे प्रमाण ०.००% आहे. बँकेच्या भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (सीआरएआर) १०.८३% एवढे असून विविध आर्थिक निकषांची पूर्तता नियमितपणे करून याही वर्षी बँकेस वैधानिक लेखापरिक्षणामध्ये ‘अ’ ऑडिट वर्ग मिळालेला आहे.मागील ४० वर्षांच्या वाटचालीमध्ये बँकेने जिल्हयातील सर्व घटकांचा विचार करून विविध योजनांद्वारे उत्तमोत्तम बँकिंग सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आधुनिक बँकिंगचा वेळोवेळी अंगिकार करून ग्राहकांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या बरोबरीने आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामुळेच मागील १८ महिन्यात रू. १०११ कोटींच्या व्यवसाय वाढीसह मोठे उद्दिष्ट बँकेने गाठले आहे. यामुळे मागील बऱ्याच कालावधीपासून ठरविलेले रु.५००० कोटींचे व्यवसाय गाठण्याचे उद्दिष्ट पूर्णत्वास आले असून कोकणातील अग्रगण्य बँक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँक पुढे आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाटचालीत हा मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे आज सर्व जिल्हा वासियांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी सन २०२३-२४ या आर्थिक वर्ष अखेरीस रू.६००० कोटी व्यवसायाचा टप्पा गाठण्याचा बँकेचा संकल्प असल्याचे नमूद करून, बँक जिल्हा वासियांना उत्तमोत्तम बँकिंग सेवा देण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. तसेच यासाठी बँकेच्या सभासद संस्था, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व जिल्हावासियांकडून आवश्यक सहकार्य मिळेल असा विश्वास व्यक्त करून बँकेच्या दि. ३० जुलै २०२३ रोजी होत असलेल्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्व सभासद संस्था प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!