कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 गतवर्षीच्या नुकसानीचे सव्वा दोन कोटी मंजूर

🟥आढावा बैठकीत दीपक केसरकर यांची माहिती : यंदाच्या नुकसानीची भरपाईही मिळवून देणार! आंबोलीत कायमस्वरूपी स्टॉल देणार!*

🎥 Kokan Live Breaking News

✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि.२८ :- गतवर्षी झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरस्थितीची नुकसान भरपाई सव्वादोन कोटी रुपये आहे. हा निधी देण्यासंदर्भातील अध्यादेश निघाला आहे. त्यामुळे लवकरच सावंतवाडी व कुडाळ या दोन तालुक्यातील पूरस्थितीत ज्यांचे नुकसान झाले. त्यांना भरपाई मिळणार आहे. तसेच गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत ज्यांची घरे व झाडांची नुकसानी झाली, त्यांची भरपाई आपण मुंबईत गेल्यावर पाठपुरावा करून मंजूर करून देणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या सभागृहात जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी वीज, दूरध्वनी, वैद्यकीय सेवा, सार्वजनिक बांधकाम, वनविभागाला सूचना करण्यात आल्या. सिंधुरत्न योजनेच्या कामासंदर्भातही त्यांनी आढावा घेतला. आठवडाभरात पुन्हा या संदर्भात आपण बैठक घेऊ, असेही स्पष्ट केले. केसरकर म्हणाले, गतवेळच्या पूरस्थितीत माडखोल, बांदा, इन्सुली आदी भागात मोठे नुकसान झाले होते. अनेकांची घरे पाण्याखाली गेली होती. सावंतवाडी तालुक्यातील भरपाई दोन कोटी रुपये अद्याप मिळाली नव्हती. तर कुडाळ तालुक्यातील नुकसानीचे २५ लाख मिळून २ कोटी २५ लाख रुपये आपण पाठपुरावा करून मंजूर करून घेतले आहेत. लवकरच भरपाईचे वितरण केले जाणार आहे.

गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यात झालेल्या नुकसानीची भरपाईही लवकरच दिली जाणार आहे. मात्र, ज्यांच्या घरांचे, झाडांचे नुकसान झाले आहे, अशा व्यक्तींची यादी आपणतयार केली आहे. त्यांना शासनाची मदत मिळण्याआधी आपण वैयक्तिक मदतही करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता ज्यांची नुकसानी झाली आहे, त्यांना भरपाई देण्यासंदर्भात आपण मुंबईत गेल्यावर पाठपुरावा करून ती कशी मंजूर होईल, याकडे लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!