🟥 छप्पर उडालेल्या बसचा व्हिडीओ व्हायरल ; महामंडळाकडून खुलासा; अभियंता निलंबित
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴गडचिरोली, दि-२७:– महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारातील एसटी बसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या बसचे छप्पर उडत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत होते.व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी एसटी महामंडाळावर टीका केली. त्यानंतर आता महामंडळाने या व्हिडिओप्रकरणी खुलासा केला असून संबंधीत अभियंत्याला निलंबित केलं आहे.
दरम्यान, सदर बसच्या दुरूस्तीचे काम विभागीय कार्यशाळेमध्ये विहीत वेळेत पूर्ण न केल्यामुळे संबंधीत विभागाचे यंत्र अभियंता शि. रा. बिराजदार यांना महामंडळाने निलंबित केले आहे. बसचे काम वेळेत पूर्ण न करणे, बस त्रुटीसह वाहतुकीसाठी उपलब्ध करुन दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन बसेस मार्गस्थ कराव्यात असे निर्देश आगार व्यवस्थापनाला देण्यात आले आहे. यासंबंधीचे खुलासा पत्र आता समोर आले आहे.
काय होतं व्हिडिओमध्ये?
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराची ही बस असून गडचिरोली – अहेरी या मार्गावर धावत असताना या बसचा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. यामध्ये या बसचे छप्पर उडाल्याचं दिसत होतं. सुदैवाने बसचे छप्पर तुटून अर्ध्यातच अडकल्याने मोठी दुर्घटना टळली
लालपरीची दयनीय अवस्था
अतिमागास अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. पावसाळ्यात बसमध्ये पाणी गळणे, बस रस्त्यात बंद पडणे हे नित्याचेच झालेले असताना बुधवारी (ता. २६) चालत्या बसचे चक्क छप्परच उडाले. गडचिरोलीवरून अहेरीकडे जात असलेल्या या बसचे छप्पर चामोर्शी मार्गावर उडाले. अर्धवट छप्पर तुटलेल्या अवस्थेतच ही बस काही किलोमीटर तशीच धावत राहिली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

