कोकणक्राइममहाराष्ट्ररत्नागिरी

🟥 अलोरे शिरगांव पोलीसांनी पाठलाग करून पकडले “दरोडेखोर”

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-२७:- दिनांक 26/07/२०२३ रोजी सकाळी 09.00 वा. अलोरे शिरगांव पोलीस ठाणे हद्दीमधील चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक मधील असणाऱ्या आपल्या खात्यामधील फॅमिली पेंशनची काही रक्कम काढण्याकसाठी मुंढे, चिपळूण येथील राहणाऱ्या 65 वर्षीय जेष्ठ नागरिक महिला आपल्या वाडीतील राहणाऱ्या अन्य एका जेष्ठ नागरिक महिले सोबत मुंढे एस.टी. स्टॉप वर शिरगांवला जाण्यासाठी वाट पहात असताना एक पोपटी (हिरव्या) रंगाची कार त्यांच्या बाजूला येऊन थांबली व गाडी मधील बसलेल्या चालकाने तुम्हाला कुठे जायचे आहे असे विचारून त्यांना गाडीत पुढे बसण्यास सांगितले व गाडीत पुरेशी जागा नसल्याचे सांगून सोबत असलेल्या जेष्ठ नागरिक महिलेस गाडी मध्ये घेतले नाही व काही अंतरावर गेल्यावर गाडी मधील बसलेल्या एका महिलेने तसेच एका इसमाने त्यांच्या गळ्यातील ₹93500/- किंमतीची सोन्याची माळ जबरदस्तीने जिवे मारण्याची धमकी देऊन व मारहाण करून हिसकावून घेण्यात आली तसेच शिरगांव येथील ब्राह्मणवाडी जवळ त्यांना घाडीतून खाली उतरविण्यात आले.

मुंढे, चिपळूण येथे राहणाऱ्या या 65 वर्षीय जेष्ठ नागरिक महिलेने लागलीच मागून येणाऱ्या एस.टी. बस ने अलोरे शिरगांव पोलीस ठाणे गाठले व आपली तक्रार देऊन सदर गाडीचा नंबर 1657 असल्याचे व यातील असणाऱ्या व्यक्तींचे वर्णन पोलीसांना सांगितले.

या मिळालेल्या माहितीच्या आधारे अलोरे पोलीसांमार्फत लागलीच नाकाबंदी करण्यात आली व या गाडीचा पाठलाग करून कुंभार्ली घाटामध्ये शिताफीने गाडी व गाडीतील सर्वांना पकडण्यात आले.

गाडीमधील असणाऱ्या 1) सूरज समाधान काळे, वय 21 रा. कुंभारी, ता. जिल्हा उस्मानाबाद, 2) सरस्वती सूरज काळे, वय 21 कुंभारी, ता. जिल्हा उस्मानाबाद, 3) राहुल अनिल शिंदे, वय 35 रा. सारोळे, ता. बार्शी जि. सोलापूर व 4) कामिनी राहुल शिंदे, वय 32 रा. सारोळे, ता. बार्शी जि. सोलापूर या चारही जणांना त्यांच्या Chevrolet Beat गाडी क्रमांक MH-12-HN-1657 सह ताब्यात घेण्यात आले व त्यांच्या विरुद्ध अलोरे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 50/2023 भा.द.वि. संहिता कलम 394, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दखल करण्यात आला व दि. 26/07/2023 रोजी 18.18 वा अटक करण्यात आलेली आहे.

गुन्ह्यातील जबरीने चोरलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे तसेच या गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की, नमूद आरोपी हे गुन्हा करण्यासाठी पोपटी रंगाची Chevrolet Beat कार क्रमांक MH-12-HN-1657 चा अथवा अन्य वाहनाचा वापर करत असून ते पायी चालत जाणारे व ज्यांचे गळ्यात सोन्याचे दागिने आहेत अश्या जेष्ठ नागरिकांना विशेषतः जेष्ठ महिलांना हेरून त्यांना स्वतःहून लिफ्ट देऊन कारमध्ये बसण्यास सांगतात व प्रवासा दरम्याने त्यांना बोलण्यात गुंतवून तसेच “तुमच्यामुळे कारमध्ये गर्दी झाली आहे, इकडे सरका-तिकडे सरका, हात वर करा” असे बोलून लक्ष विचलित करून हातचलाखीने गळ्यातील सोन्याचे दागिने चोरतात व लिफ्ट दिलेल्या नागरिकांस मधेच रस्त्यात उतरून निघून जातात.

नजीकच्या काळात नमूद आरोपींनी रत्नागिरी जिल्ह्यात व अन्य ठिकाणी गुन्हे केले आहेत का? या बाबत अधिक तपास चालू आहे.

ही कारवाई खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

1) सपोनि. श्री सुजीत गडदे, अलोरे शिरगांव पोलीस ठाणे,

2) पोहवा /711 श्री. गणेश नाळे,

3) पोशि /972 श्री. राहुल देशमुख व

4) महिला होमगार्ड /1231 श्रीमती. विजया चिपळूणकर.

 

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!