आणखीकोकणरत्नागिरीसामाजिक

रत्नागिरी मध्ये ७५ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.०४: सद्गुरु माता सुदिक्षा जी  महाराजांच्या कृपेने संत निरंकारी चॕरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रत्नागिरी येथील सत्संग भवन येथे  नुकतेच रक्तदान शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते.  सदर रक्तदान शिबिरात ७५ निरंकारी रक्तदात्यांनी रक्तदान करून सद्गुरूच्या मानवतेच्या कार्यात आपले योगदान दिले.

सध्या लॉकडाऊनची  परिस्थिती असतानादेखील  शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताची  कमतरता असल्याने शासकीय रुग्णालयाच्या मागणीने  हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.  यामध्ये  जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात निरंकारी भक्त सहभागी झाले होते .या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मेघी ब्रांचे मुखी जयराम केसरकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी संत निरंकारी मिशनच्या  समाजोपयोगी कार्याचा आढावा घेतला त्याचबरोबर covid-19 च्या वैश्विक महामारीच्या काळात संत निरंकारी मिशनने सरकारकडून दिलेल्या निर्देशांचे पालन करत समाजकल्याणाचे अनेक उपक्रम राबवले त्यावर महात्मा ने प्रकाश टाकला यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, निरंकारी सत्संग भवन क्वारंटाईन सेंटर म्हणून देणे .गरजूनां मास्क व सॅनिटायझरचे वाटप करणे इत्यादी सेवांचा समावेश होता.या रक्तदान शिबिरात रक्त संकलित करण्याचे काम शासकीय रुग्णालय, रत्नागिरीच्या टीमने केले.

हे रक्तदान शिबिर क्षेत्रीय प्रबंधक महात्मा गंगाधर विचारे आणि रत्नागिरी सेक्टर चे संयोजक प. पू. रमाकांत खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले हे शिबिर  यशस्वी होण्यासाठी सेवादल विभागाने उत्तम सहकार्य केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महात्मा भगवान मोटे यांनी केले.

*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*

   *🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_

💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!

*🏃🏻‍♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!