आणखीमहाराष्ट्र

🟥 राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट, का वाढलाय पावसाचा जोर?

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴पुणे, दि-२७:- राज्यभरात सुरु असलेला मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यास गुरुवारी रेड अलर्ट दिला आहे.तसेच काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. विदर्भात काही ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे या भागांतील नद्या भरभरून वाहू लागल्या आहेत. गोदावरी नदीची पातळी वाढत असल्यामुळे नदीच्या काठावर असलेले मेडिगट्टा धरणाचे दरवाजे चार फुटांनी उघडण्यात आले आहे.

 

मुंबईत काय आहे परिस्थिती

 

मुंबईत गुरुवारी दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईला रेड अलर्ट दिल्यामुळे कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई आयुक्त इकबालसिंग चहल यांनी केले आहे. ठाणे जिल्हा परिषदेने पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

 

का सुरु आहे पावसाचा जोर

 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेकडे होत आहे. त्यामुळे अजून पुढील तीन, चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी वर्तवली आहे.

 

पुणे जिल्ह्यास पुन्हा रेड अलर्ट

 

पुणे जिल्ह्यास गुरुवारी रेड अलर्ट दिला आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सातार जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे. ठाणे, पालघर, अमरावती जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोल्हापुरात पावसाने विश्रांती घेतली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या दहा तासांपासून स्थिर आहे. यामुळे राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा बंद करण्यात आले.

 

विदर्भात पाऊस

 

विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, सोलापूर, सांगलीमध्ये पावसाची शक्यता आहे.

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!