🟥 बंदर जेटीच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांसाठी वाट ठेवल्याने समाधान.
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मालवण, दि-२७:- बंदर जेटीच्या ठिकाणी बाजारास येणाऱ्या व्यापाऱ्यांना, मालवाहकांना त्यांच्या गाड्यांसाठी पंधरा फुटाची वाट ठेवल्याने आता व्यापाऱ्यांना भेडसावणारी समस्या दूर झाली आहे. या कामासाठी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी मेरिटाईम बोर्डाकडे पाठपुरावा केला होता. हे काम मार्गी लागल्याने त्यांनी मालवणवासीयांच्यावतीने मेरिटाईम बोर्डाचे आभार मानले आहेत.
बंदर धक्का येथे मेरिटाईम बोर्डा- च्यावतीने वाहनतळ तसेच काँक्रीट भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम करत असताना वाहनतळाकडून बाजारपेठ येथे जाण्यासाठी लहान वाट ठेवण्यात येणार होती. यामुळे बाजारपेठ येथे गाड्या घेऊन येणारे, त्याचप्रमाणे व्यापारी वर्गाच्या सामानाचे मालवाहक ट्रक यांना या ठिकाणी येणे अशक्य होणार होते. त्याचबरोबर या वाहनतळाच्या मधून बाजारपेठ या ठिकाणाहून येणारे पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी मोरी ठेवण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठ येथील पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत होता. ही मोरी सुद्धा बदलून अन्य ठिकाणी नेण्यात येत होती. याबाबतची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी व्यापारी संघाच्या पदाधिकारी, अन्य व्यवसायिकांसह येथील बंदर कार्यालयात भेट देत संबंधित अधिकाऱ्यांची या समस्येकडे लक्ष वेधले. बाजारपेठ येथे जाण्यासाठी १५ फुटाची वाट ठेवण्याबाबत तसेच पाणी निचरा होण्यासाठी पूर्वीपासून असलेली वाट कायम ठेवण्याबाबत सूचना करण्यात आली. त्यानंतर या सूचनेची तात्काळ दखल मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली आणि व्यापारी, व्यवसायिकांनी केलेल्या सूचनेनुसार १५ फुटाची वाट आणि पूर्वीच्या ठिकाणी असलेली मोरीचे बांधकाम त्याचठिकाणी करून दिले. त्यामुळे व्यापारी वर्गाकडून तसेच मालवणवासीयांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

