🟥 आपत्तीग्रस्तांच्या निधीप्रश्नी नियमांचा बाऊ नको; उपमुख्यमंत्री पवार यांचे जिल्हाधिकार्यांना निर्देश
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई, दि-२७:- अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे, हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे.त्यासाठी नियमांचा बाऊ न करता, वेळ पडली तर प्रसंगी वेगळा मार्ग पत्करून हे काम करावे लागले, तर त्याचा निर्णय जिल्हाधिकार्यांनी घ्यावा. जनहिताच्या प्रत्येक कार्यात शासन तुमच्यासोबत आहे. आपत्ती निवारण, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांच्या बैठकीत दिली.
राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती व अवर्षण परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्यांकडून दूरद़ृश्य प्रणालीद्वारे घेतला. पुरामुळे ज्या गावांत घरांत, रस्त्यांवर गाळ साचला असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी ‘राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधी’ तसेच जिल्हा परिषदेतील निधीचा उपयोग करावा. प्रत्येक जिल्ह्याला दिलेला 30 लाख रुपयांचा आगाऊ निधी वापरावा. निधी कमी पडल्यास तातडीने निधीची मागणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
अतिक्रमणे प्राधान्याने हटवा
राज्यात अनेक भागांत नदी, नाले, ओढ्यांत अतिक्रमणे झाली आहेत. अशा ठिकाणी जिल्हाधिकार्यांनी नदी, नाल्यांतील अतिक्रमण काढण्याचे काम प्राधान्याने व कठोर भूमिका घेऊन पार पाडावे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

