कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 अखेर सावंतवाडी पोलीसांनी “त्या” युवकांचा बनावट प्रकार केला उघड..

🟥 गाडीचे हप्ते फेडण्यासाठी आम्हीच हा प्रकार केल्याचे युवकांची कबुली..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२७:- बेळगांव येथून आंबोली मार्गे येत असताना आंबोली घाटात चाकूचा धाक दाखवून आपल्याकडील लाखो रुपयाची रक्कम व मोबाईल अज्ञात व्यक्तींकडून लुटल्याची तक्रार रत्नागिरी येथील दोघा युवकांकडून सावंतवाडी पोलिसांत देण्यात आली. मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत त्याच युवकांचा हा बनाव असल्याचे उघड झाले. गाडीचे हप्ते फेडण्यासाठी आम्हीच हा प्रकार केल्याचे त्यांनी कबुल केले.

दरम्यान, त्यांनी केलेल्या या कृत्याबाबत त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुरेश तलवार व ओमकार किर अशी त्या युवकांची नावे आहेत. हे दोन्ही युवक मंगळवारी रत्नागिरी नाटे येथून आपल्या ताब्यातील मालवाहू टेम्पोतून मासे घेऊन बेळगाव येथे गेले होते. बुधवारी परतत असताना त्यांनी शक्कल लढवत आपल्याला आंबोली घाटात चोरट्याने लुटले असे भासवून तब्बल लाखो रुपये परस्पर हडप करण्याचा प्रकार केला. या एकूणच प्रकारानंतर मात्र पोलीस यंत्रणेची चांगलीक धावपळ झाली. पोलीस चौकशीत त्या दोघांकडून मिळालेली उत्तरे वेगवेगळी असल्याने त्या दोघांवर संशय आल्याने अखेर त्यांचा हा बनाव उघड झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरीतील ओमकार किर याने

दोन वर्षांपूर्वी मालवाहू टेम्पो हप्त्यावर खरेदी केला होता. त्याचे कर्ज थकीत होते. दरम्यान, मंगळवारी त्याला रत्नागिरी येथील एका मासे व्यावसायिकाचे भाडे मिळाले होते. सदर टेम्पोतून मासे घेऊन तो बेळगाव येथे गेला होता. यावेळी त्याने मयुरेश याला आपल्या सोबत घेतले होते. या माशांची रक्कम संबंधित बेळगाव येथील व्यक्तीने ओमकार व मयुरेश यांच्याजवळ देऊन ती मासे व्यवसायिकांजवळ देण्यास सांगितली होती. सदरची रक्कम घेऊन ते बुधवारी बेळगाव येथून सकाळी निघाले. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते आंबोली घाटात आले असता त्यांनी सदरची रक्कम हडप करण्याचा प्लॅन केला आणि ते आंबोलीतून खाली बावळट तिठ्यावर आले.. तेथील पोलिसांना त्यांनी आपल्याला दोन अज्ञात व्यक्तींकडून चाकूचा धाक दाखवून आपल्याकडील लाखो रुपयांची रक्कम व मोबाईल लुटल्याचे सांगून आपल्याला पोलिसात तक्रार करायची असे सांगितले. तेथील पोलिसांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्या असे सांगितल्यानंतर ते टेम्पो सहित पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे बनाव केलेली हकीकत सांगितल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब तपासाची सुत्रे हाती घेत दोघांसहीत पुन्हा आंबोली गाठली.

त्यानंतर त्यांनी वर्णन केलेल्या जागी जाऊन त्यांची सविस्तर चौकशी केली असता त्यांच्याकडून परस्पर विरोधी गोंधळात टाकणारी उत्तरे देण्यात येऊ लागली. एकूणच त्या दोघांबाबत पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता त्या दोघांनी हा बनाव केल्याचे मान्य करीत तशी कबुलीही दिली. त्यानंतर टेम्पोमध्ये लपवून ठेवलेली रक्कमही पोलिसांकडे सुपूर्त केल्याचे पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले. आपल्याला टेम्पोचे थकीत हप्ते भरावयचे होते. दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या टेम्पोचे तब्बल १२ लाख रुपये भरायचे राहीले होते. त्यामुळे आपण हा प्रकार केल्याचे ओमकार याने कबुल केले. शिवाय गाडीला भाडी मिळत नसल्याने हप्ते चुकले आहेत ही रक्कम घेऊन आपण गाडीचे हप्ते फेडणार होतो असे त्याने सांगितले. एकूणच या प्रकाराबाबत पोलिसही चक्रावून गेले. दरम्यान, या घटनेबाबत त्यांच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!