कोरोना लस बुक करण्यात भारत जगात पहिल्या क्रमांकावर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : नवी दिल्ली
🎴नवी दिल्ली,दि.04: कोरोना व्हायरस लसीचे डोस बुक करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंत कोरोना व्हायरस लासीचे तब्बल 160 कोटी डोसची बुकिंग केली आहे. जगभरात लसीच्या बुकिंग संदर्भात ड्यूक युनिव्हर्सिटीच्या अहवालाप्रमाणे भारतानंतर सर्वाधिक डोसची बुकिंग युरोपियन युनियन आणि अमेरिकेने केली आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत यूरोपियन यूनियनने 158 कोटी तर अमेरिकेने 100 कोटीहून अधिक कोरोना लसींचे बुकिंग केले आहे. या लसी ट्रायलमध्ये यशस्वी ठरल्या तर वापराची मंजुरी मिळताच लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल.
भारताने तीन कंपन्यांशी केलाय करार
जगभरात ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेकाच्या लसीची मोठी मागणी आहे. अनेक देशांनी या लसीचे 150 कोटी डोस बुक केले आहेत. भारतात ऑक्सफर्डच्या लसीचे सीरम इंस्टिट्यूट आणि एस्ट्राजेनेकाकडून क्लिनिकल ट्रायल केले जात आहे. भारत आणि अमेरिकेने या लसीचे 50-50 कोटी डोस बुक केले आहेत. या शिवाय नोव्हावॅक्सच्या लसीचे 120 कोटी डेस देखील बुक करण्यात आले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन नोव्हेंबर महिन्यात म्हणाले होते, भारत जुलै-ऑगस्ट 2021 पर्यंत 50 कोटी डोज मिळविण्यासाठी लस निर्माता कंपन्यांच्या संपर्कात आहे. ड्यूक युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, भारताने रशियन कोरोना लस Sputnik V च्या 10 कोटी तर नोवाव्हॅक्सच्या लसीच्या 100 कोटी डोससाठी डील केली आहे.
भारत रशीयन लसीचे उत्पादनही करणार
भारत रशियन कोरोना लस स्पुतनिक V चेही वर्षाला 100 मिलियन डोस तयार करणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि हैदराबादची कंपनी हेटेरो बॉयोफार्मा यांच्यात करार झाला आहे. आरडीआयएफने म्हटले आहे की, 2021 च्या सुरुवातीला या लशीचे उत्पादन सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. ही लस मानवी परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यावर 91.4 टक्के प्रभावी ठरल्याचा दावा रशियन कोरोना लस स्पुतनिक V कडून करण्यात आला होता.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

