🟥जिल्ह्यात ४०४ गावांमध्ये पीक कापणी प्रयोग
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओरोस, दि.२५:* जिल्ह्यातील भात कापणी प्रयोगासाठी ३४१, तर नागली पीक कापणी प्रयोगासाठी ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारऱ्यांचे सनियंत्रण या पूर्ण पीक कापणी प्रयोगांवर राहणार आहे. सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नियोजनानुसार पीक कापणी प्रयोगांची कार्यवाही निर्धारित वेळेत करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिल्याची माहिती जिल्हा सल्लागार अरुण नातू यांनी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपस्थित होते. यावेळी भात पीक कापणी प्रयोगाकरिता महसूल यंत्रणेकडील तलाठ्यांकडे ११४ गावे, जि. प. यंत्रणेकडील ग्रामसेवकांकडे ११४ गावे तसेच भात नागली पीक कापणी प्रयोगाकरीता कृषी विभागाकडील कृषी सहाय्यक यांच्याकडे १७६ गावे निश्चित करून देण्यात आली आहेत. पीक कंपनी प्रयोगाद्वारे मिळणारी उत्पन्नाची आकडेवारी विश्वासार्ह व अचूक येण्यासाठी संबंधित गावचे पोलीस पाटील, ग्रा. पं. सदस्य व गावांतील प्रगतिशिल शेतकरी यांच्या उपस्थितीत पर्यवेक्षण अधिकारी यांनी पीक कापणी प्रयोगांचे पर्यवेक्षण करावे, असे नातू यांनी प्रशिक्षणवर्गात स्पष्ट केले. २५ ते २८ जुलै या कालावधीत तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती सदस्यांसाठी प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षणवर्गात सातारा कृषी अधीक्षक कार्यालयाचे तंत्र अधिकारी श्री. नलावडे, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी कार्यालयाचे तंत्र अधिकारी शरद कालेल, जिल्हा सांख्यिकी अधिकारी अ. आ. कुलकर्णी, राष्ट्रीय नमुने सर्वेक्षण संस्था कोल्हापूरचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

