🟥 मनसेची सार्वजनिक बांधकाम विभागात धडक..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१८:-* सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यांवर पडलेले खड्डे ,नव्याने केलेल्या सावंतवाडी ते आंबोली रस्त्याची पहिल्याच पावसात डांबर उखडून गेल्याने झालेली दुरावस्था व एम एन जी एल कंपनी मार्फत पाईप लाईन साठी करण्यात आलेल्या खोदाईमुळे होणारे अपघात या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मनसे शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागात धडक देवून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कार्यकारी अभियंता यांच्या अनुपस्थित सह कार्यकारी अभियंता सगरे यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दरम्यान ज्या ठेकेदाराने सावंतवाडी आंबोली या रस्ताचे काम केले आहे त्याला काम परत करण्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे व हे काम परत नव्याने करून घेण्यात येणार असल्याचे आश्वासन या वेळी मनसे शिष्टमंडळाला देण्यात आले. परंतु सदर ठेकेदाराला काम न देता नवीन ठेकेदार नेमण्याकरिता मनसेचे शिष्टमंडळ आग्रही आहे तसेच पाईप लाईन साठी खोदलेले रस्ते देखील लवकरच निट केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आत्तापर्यंत ज्या ठिकाणी गॅस पाईपलाईन व पाण्याची पाईपलाईनचे काम केले आहे त्या ठिकाणचे जर रस्ते व्यवस्थित झाले नाहीत तर सावंतवाडी विधानसभेमध्ये कोणतेही ठेकेदाराला काम करून देणार नाही असा इशारा मनसेच्या शिष्टमंडळाने यावेळेस दिला.या वेळी माजी उपजिल्हाध्यक्ष व विधी व जनहित जिल्हा संघटक अँड. अनिल केसरकर ,माजी संपर्क अध्यक्ष. महेश परब, परिवहन जिल्हा संघटक राजू कासकर ,सुधीर राऊळ ,संतोष भैरवकर ,राकेश परब ,साहिल तळकटकर ,अभिजीत खांबल , जय राऊळ, ओमकार नवार , संदिप राऊळ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

