कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सरसकट टोलमाफीची तरतूद नाही : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

🟥 टोलमुक्त कृती समितीला पाठविले पत्र..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१६:-* केंद्र शासनाच्या नियमानुसार टोल प्लाझाच्या ठिकाणी २० कि. मी. परिघातील बिगर व्यावसायिक वाहनांना ३३० रु. मासिक पास सवलत मिळू शकते. तसेच जिल्ह्यातील नोंदणीकृत वाणिज्य प्रकारातील वाहनांना ५० टक्के सवलत देण्यात येईल. कोणत्याही जिल्ह्यातील सर्व वाहनांना सरसकट टोलमाफी देण्याबाबतची तरतूद २००८ च्या नियमामध्ये करण्यात आलेली नाही, असे पत्र टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये यांना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कोल्हापूरचे प्रकल्प संचालक व्ही. डी. पंदरकर यांनी पाठविले आहे..

टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीच्यावतीने जानवली ते पत्रादेवी विभागातील ओसरगाव टोलनाका येथे पथकर वसुलीला विरोध असल्याबाबत पत्र पाठविले होते. त्याला दिलेल्या आलेली नाही. उत्तरात म्हटले आहे की, राष्ट्रीय राजमार्ग क. ६६ या चौपदरी महामार्गावरील जानवली ते पत्रादेवी विभागातील कि. मी. ४०८.१२८ येथील ओसरगाव टोलनाका येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्याबाबतचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले आहे. सध्याच्या प्रचलित केंद्र शासन नियम The National Highways Fee (Determination of Rates and Collection) Rules, २००८

 

नुसार राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर २० कि. मी. परिघात राहणारे वाहन मालक पत्त्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यावर टोल फी भरण्यापासून सूट मागू शकतात. शासन नियमानुसार आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी टोल प्लाझापासून २० कि. मी. अंतरावर राहणाऱ्या स्थानिक बिगर व्यावसायिक वाहनांसाठी मासिक पासाचा दर ३३० रु. असेल. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत वाणिज्य प्रकारातील वाहनांना टोल फीमध्ये ५० टक्के इतकी सवलत देण्यात येते. त्याकरिता संबंधित टोल ठेकेदाराकडे वाहनाच्या नोंदणीपत्राची व आधारकार्डाची प्रत सादर करावी लागते. कोणत्याही जिल्ह्यातील सर्व वाहनांना सरसकट टोलमाफी देण्याबाबतची तरतूद २००८ च्या नियमामध्ये करण्यात

 

• राष्ट्रीय महामार्गावरील टोल फी आकारणी ही केंद्र शासनामार्फत (NH Fee Rules, २००८) नुसार केली जाते. त्यामधून महामार्ग बांधणीच्या खर्चाची वसुली आणि राष्ट्रीय महामार्गाची देखभाल व दुरुस्ती करून महामार्ग सुस्थितीत ठेवले जातात. याबाबीचा विचार करता ओसरगाव टोलनाका येथील टोल वसुलीस आपण आवश्यक ते सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

 

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!