ठाणेमहाराष्ट्रसामाजिक

🟥 ठाण्यात आदर्श नालेबांधणी आणि दत्तक योजनेला सुरुवात, भाजप आमदारांची नवीन संकल्पना..

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ठाणे, दि-१५:-* दरवर्षी नालेसफाई होत असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडत असताना आमदार संजय केळकर यांनी आदर्श नाले बांधणी आणि नाले दत्तक योजनेचा अभिनव प्रयोग ठाणे शहरात मांडला आहे. लोकसहभागातून होत असलेल्या या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून त्याची पाहणी शनिवारी त्यांनी केली.

ठाणे शहराला नाल्यांची समस्या कायम भेडसावत असून नालेसफाईतून दरवर्षी मोठा भ्रष्टाचार होत असतो. आमदार संजय केळकर पावसाळ्यापूर्वी नाल्यांची पाहणी करून प्रशासनाला सूचना करत असतात. ही समस्या कायमस्वरूपी सुटावी आणि भ्रष्टाचार थांबावा यासाठी त्यांनी लोकसहभागातून आदर्श नाले बांधणी आणि नाले दत्तक योजना ही संकल्पना पुढे आणली. जागर फाऊंडेशन या संस्थेने आयुक्तांकडे याबाबतचा प्रस्ताव दाखल केला तर केळकर यांनी आयुक्तांना याबाबतची उपयुक्तता पटवून दिल्यानंतर आयुक्त अभिजित बांगर यांनी योजनेस हिरवा कंदील दिला.

या प्रकल्पाच्या कामाची पाहणी करताना आमदार संजय केळकर यांनी समाधान व्यक्त केले. हा प्रयोग ठाण्यात प्रथमच राबवला जात असून परिसर सुंदर आणि स्वच्छ राहणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरात अनेक ठिकाणी त्याची अमलबजावणी करून नाले भ्रष्टाचारमुक्त करता येतील, पर्यायाने ठाणेकरांनी महापालिकेला कररुपाने दिलेल्या पैशांची उधळपट्टी होणार नाही, असे मत केळकर यांनी मांडले.

 

या योजनेसाठी डॉ. मूस मार्गालगतचा नाला निवडण्यात आला. अंदाजे 300फूट लांब आणि 30फूट रुंद नाल्यावर आधुनिक पद्धतीने आवरण चढवण्यात येऊन पलिकडून वाहत येणारी घाण ठराविक अंतरावर रोखण्यात येणार आहे. त्यामुळे पुढे पाण्याचा प्रवाह मोकळा होणार आहे. साचलेली घाण काढण्यासाठी पोकलेन उतरेल अशी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूस आवरण करण्यात येणार असून व्हर्टीकल गार्डन करता येणार आहे. यामुळे परिसर सुंदर दिसेलच, शिवाय नाला दुर्गंधीमुक्त होणार आहे.

पाहणी दरम्यान आमदार केळकर यांच्याबरोबर माजी नगरसेवक संजय वाघुले, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, बोरकर रियल्टीचे महेश बोरकर, नंदिनी बोरकर सारंगधर, जागर फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश सोंडकर आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!