महाराष्ट्रराजकीय

🟥 जे घरी बसून काम करतात, त्यांना जनता घरीच बसवते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴नाशिक, दि-१५:-* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जे घरी बसून काम करतात, त्यांना जनता घरीच बसवते, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना हल्लाबोल केला आहे.’लोकांच्या दारोदारी सरकार फिरतंय, अशी टीका काही विरोधक करू लागलेल आहेत. खरं म्हणजे घरी जे बसतात, घरातून काम करतात. त्याच्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही. शरद पवार यांनी देखील त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलेले आहे. घरी बसलेल्यांना जनता घरी बसवून टाकते आणि लोकांमधील कार्यकर्त्यांना लोकांमध्ये येण्याची संधी देते’, असं टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सोडले आहे.

‘घरी जे बसून काम करतात, त्यांना जनता घरीच बसवते’

नाशिकमध्ये’शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकांच्या दारोदारी सरकार फिरतंय अशी टीका काही विरोधक करू लागलेल आहेत. पण, दारोदारी फिरवून सामान्य माणसांची काम करण्यासाठी आपलं जनतेचं सरकार स्थापन झालेलं आहे. घरी बसून राहण्यासाठी सत्ता नसते, ही सत्ता लोकांच्या दारात घराघरात जाऊन योजना राबवण्यासाठी असते, लोकांपर्यंत जाण्यासाठी सत्ता असते. शासन आपल्या दारी लोकाभिमुख कार्यक्रम असून एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना घेता येत आहे. तसेच काही लोकांनी घरी बसून कामे केली. त्यामुळे घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवेल, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

पुढे ते म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम क्रांतिकारी असून या माध्यमातून आम्ही लोकांच्या हिताची कामे करत आहेत. तसेच पंतप्रधान मोदींचे नेतृत्व स्वीकारून अजित पवार आमच्यासोबत आले असून राज्याच्या विकासाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. अडीच वर्षात अनेक विकासकामे थांबली होती. पण, आमच्या सरकारने सर्व स्पीड ब्रेकर काढून ती सर्व कामे पुन्हा सुरु केली, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आम्ही तीन जण एकत्र आलो असून आम्ही समजूतदार आहोत. तसेच देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचे असून ते निष्कलंकित माणूस आहेत. विरोधकांची वज्रमूठ सभा ही वज्रझूठ सभा ठरली आहे. त्यांनी जेवढे आरोप केले तेवढ्या त्यांच्या जागा कमी झाल्या, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी म्हटलं आहे.

अजित दादा सहकाऱ्यांचे स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित दादा आणि त्यांचे सहकाऱ्यांचे युती सरकारमध्ये मनापासून स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, आता सरकार शिवसेना भाजपा युतीचे सरकार हे ताकदीने वेगाने निर्णय घेत होतो. यामध्ये अजित दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भर पडलेली आहे. त्यामुळे अधिक वेगवान सरकार होईल, अधिक वेगाने निर्णय घेईल. मागील अडीच वर्षात सर्व काम ठप्प होती. सर्व प्रकल्प बंद होते. मुंबईचा मेट्रो असेल, समृद्धी महामार्ग असेल, अनेक जे प्रकल्प थांबले होते. थांबवले गेले होते. परंतु देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा देखील अनेक प्रकल्प सुरू केल्यानंतर सारखे जलयुक्त शिवारसारखे शेतकऱ्यांच्या फायद्याचे प्रकल्प बंद झाले. पण युतीचं सरकार आल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर धडाधड काढून टाकत प्रकल्पांना चालना देण्याचे काम सरकारने केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पोटदुखीवर रामबाण उपाय : फडणवीस

या कार्यक्रमात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. फडणवीस म्हणाले की, ‘नाशिकमध्ये शासन रामदरबारी आले आहे. जे राज्य काम करते ते रामराज्य असते. त्यामुळे हा शासकीय योजनांचा कुंभमेळाच आहे, ज्याच्यामुळे आपण सगळे एकत्र आला आहात. कुंभमेळ्याच्या या सेवा तीर्थावर आपली सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. पण कधी कधी चांगलं काम केलं तरी लोकांच्या पोटात दुखतं. लोकांना लाभ दिला तरी लोकांच्या पोटात दुखत. पण आता चिंता करू नका, आता कोणाच्याही पोटात दुखलं तर त्या पोट दुखीवर औषध देण्याकरता डॉ. एकनाथ शिंदे आणले आहेत’, अशी मिश्किल टिपण्णी फडणवीस यांनी केली.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!