गोगटे वाळके महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा.
गोगटे वाळके महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा.
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
लोकसंख्या नियंत्रित करणे ही काळाची गरज असून त्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे.आज भारताने चीन या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाला मागे टाकून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे परंतु ही बाब आपल्याला भूषणावह नाही. यासाठी बदलत्या काळानुसार लोकसंख्या नियंत्रणाच्या उपायात बदलाची गरज आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले.
येथील गोगटे वाळके महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने 11 जुलै रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकसंख्या या विषयावर आधारित रांगोळी स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. रांगोळी स्पर्धेमध्ये वरिष्ठ महाविद्यालय विभागात प्रथम क्रमांक जागृती शेडगे द्वितीय क्रमांक सायली कदम तृतीय क्रमांक सीमा नाईक आणि उत्तेजनार्थ सुजाता देसाई यांनी प्राप्त केला.तर कनिष्ठ महाविद्यालय विभागात प्रथम क्रमांक गौतमी तारी आणि द्वितीय क्रमांक दिव्या सावंत यांनी प्राप्त केला.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक सिद्धी दळवी व सायली कदम द्वितीय क्रमांक यतीन फाटक व जोसेफ करूकापलील
तृतीय क्रमांक गार्गी वीरनोडकर व इशा सावंत यांनी प्राप्त केला यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.रश्मी काजरेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अर्थशास्त्र विभागाचे प्रा. प्रसाद जाधव यांचे सहकार्य लाभले.रांगोळी स्पर्धेचे परीक्षण प्रा.हर्षवर्धिनी जाधव आणि प्रा.प्रसाद जाधव यांनी केले कार्यक्रमाला वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.उमेश परब आणि प्रा. निरंजन आरोंदेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमाकांत गावडे यांनी केले.तर आभार अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ.मिलन वालावलकर यांनी मानले

