शिक्षण क्षेत्रातील अदभूत रसायन -अच्यूतजी भोसले
*🔸शिक्षण क्षेत्रातील अदभूत रसायन अच्यूतजी भोसले*
*🔸वाढदिवसानिमित्त कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल परिवाराकडून शुभेच्छा*
ज्यांनी आपल्या स्वकर्तुत्वाच्या जोरावर जिद्द, चिकाटी, आणि पडेल ते काम करण्याची तयारी हे गुण अंगी असलेले,चराठे वझरवाडी येथील उजाड माळरानावर शैक्षणिक नंदनवन फुलवणारे,शेकोडो जणांच्या हाताला रोजगार देणारे,अनेकांच्या कुटुंबाचा आधार बनलेले भोसले नाॅलेज सीटी चे संस्थापक अध्यक्ष,अच्यूतजी भोसले यांचा आज वाढदिवस, सर्वप्रथम त्याच्या वाढदिवसाला माझ्या कडून व संपूर्ण कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल परिवाराकडून मनापासून शुभेच्छा.
माझी कुलदेवता आई तुळजाभवानी ने त्यांना उदंड निरोगी दिर्घ आयुष्य देऊन, जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी,त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करावे, त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा परीपूर्ण कराव्यात, जारन, तारन, मारन, संमोहन, वशीकरण, भुत, पिशाच्च, बाधा, यापासून त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करावे हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना व पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा….
अच्युत भोसले हे नाव आस्था काॅम्यूटर शाॅपी च्या माध्यमातून बऱ्याच जणांना माहित होते, मात्र अपार कष्ट ,जिद्द ,मेहनत, चिकाटी, या चतुसूत्रीच्या जोरावर अच्युत भोसले यांनी अशी काही गगन चुंबी झेप घेतली की सर्वांनाच आश्चर्याने तोंडात बोट घालावे लागले, एखाद्या शिक्षण महर्षीला लाजवेल असे शैक्षणिक नंदनवन चराठे, वजरवाडी च्या जवळ उजाड माळरानावर त्यांनी फुलविले.
पॉलिटेक्निक कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, बी फार्म डी फार्म,एम फार्म ,सी बी एस सी स्कूल, यासारखी शिक्षणाची विविध व्दारे त्यांनी एकाच छताखाली सुरू केली, गेल्या सात वर्षातील त्यांचीही गगनचुंबी झेप थक्क करणारी तर आहेच तेवढीच बऱ्या बऱ्या शिक्षण महर्षी ना विचार करण्याजोगी आहे, प्रचंड मेहनत करण्याची ऊर्जा त्यांच्या नसानसात भिनलेली असल्याने नकारात्मक ऊर्जा त्यांना स्पर्श करू शकत नाही, सकारात्मक ऊर्जेच्या जोरावर त्यांनी त्या उजाड माळरानावर एक शैक्षणिक नंदनवन फुलवले ते श्रीकृष्णाच्या गोकुळा एवढेच उल्हासदाई व आनंद देणारे आहे.
आठ दिवसापूर्वी त्याने या नंदनवनात इंजीनियरिंग कॉलेज सुरू होत असल्याची माहिती दिली आणि सर्वांना सुखद धक्का दिला, सावंतवाडी , दोडामार्ग ,कुडाळ, वेंगुर्ला, या तालुक्यातील हे पहिलेच इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मुलांना पुणे ,कोल्हापूर ,मुंबई ,येथे जावे लागत होते ते शिक्षण आता या ठिकाणी कमी खर्चात उपलब्ध होणार आहे, आपल्या वाढदिवसाच्या अगोदर त्यांनी दिलेली सिंधुदुर्ग वासियांना भेट आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, त्यांची ही यशाची शिखरे उत्तोरत्तर वाढत राहोत व गगनाला गवसणी घालणारे यश त्यांच्या चरणी लीन होवो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजाभवानी चरणी प्रार्थना.🌹🌹🌹🌹🌹

