कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

विलवडे मंदिरातील फंडपेटी फोडली

विलवडे मंदिरातील फंडपेटी फोडली

ओटवणे

विलवडे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडून आतील रक्कम घेऊन फंडपेटी नजीकच्या रस्त्यावर टाकून पसार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

बुधवारी सकाळी सुभाष दळवी आपल्या शेताकडे जात असताना त्यांना रस्त्यालगत ही फंडपेटी दिसली. ही फंडपेटी माऊली मंदिरातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देवस्थान कमिटी अध्यक्ष

बाळकृष्ण दळवी, सरपंच प्रकाश दळवी, सुरेश सावंत आदींसह देवस्थानच्या मानकऱ्यांनी मंदिराकडे धाव घेतली. दोन महिन्यापूर्वीच या देवस्थानच्या मंदिरात पाच दिवसांचा कलशारोहण मूर्ती व प्रतिष्ठापना सोहळा झाला होता. भाविकांचीही या मंदिरात वर्दळ असते. त्यामुळे या फंडपेटीमध्ये सुमारे ५० हजाराहून अधिक रक्कम असल्याची शक्यता देवस्थान मानकऱ्यांनी व्यक्त केली. या चोरीबाबत बांदा पोलिसात तक्रार दिल्यानंतर बीट अंमलदार तेली, पोलीस कॉन्स्टेबल बाळकृष्ण गवस, नाईक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या चोरीची माहिती घेतली. या चोरीमध्ये दोन ते तीन चोरट्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!