सावंतवाडी रुग्णालयात नव्याने चार डॉक्टर सेवेत
सावंतवाडी रुग्णालयात नव्याने चार डॉक्टर सेवेत
सावंतवाडी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नव्याने चार डॉक्टर नियुक्त झाले आहेत. नव्या डॉक्टरनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना फायदा होणार आहे, अशी माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली.
नव्याने डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. प्रवीण देसाई (बालरोगतज्ज्ञ) डॉ. मुकुंद अंबापूरकर (हृदयरोग व मेंदूरोगतज्ज्ञ), डॉ. अभिषेक रोडे (एमबीबीएस) हे डॉक्टर रुजू झाले आहेत. तसेच डॉ. संदीप सावंत (बालरोगतज्ज्ञ), डॉ. वजराटकर (जनरल सर्जन), डॉ. गिरीश चौगुले (जनरल सर्जन), डॉ. निखिल अवधूत (अस्थिरोगतज्ज्ञ), डॉ. आकाश एडके (एमबीबीएस) डॉ. धीरज सावंत (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. दीपक लादे (बीएमएस, आयुर्वेदिक तज्ज्ञ), डॉ. सागर जाधव (आयुर्वेदिक तज्ज्ञ), डॉ. मनाली पतवारी (भौतिकोपचार तज्ज्ञ), डॉ. समीर धाकोरकर (दंतचिकित्सक), डॉ. शुभजीत धुरी (नेत्रतज्ज्ञ) हे डॉक्टर रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते तथा जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी रुग्णालयातील डॉक्टरांची नावे व त्यांच्या तपासणी कक्षाबाबत रुग्णांना माहिती व्हावी, यासाठी डॉक्टरांचा नामफलक हॉस्पिटलमध्ये लावला आहे.

