चार वर्षांत संघटनात्मक जबाबदारीच दिली नाही – पारकर
*🟥 चार वर्षांत संघटनात्मक जबाबदारीच दिली नाही – पारकर*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि-११-* नारायण राणेंना प्रवेश दिल्यानंतर मी भाजप पक्ष सोडला व विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाख केली. पण, शिवसेना नेत्यांनी विश्वास देऊन केलेल्या विनंतीनुसार मी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केल परिणामी २०१४ मध्ये १३ हजार मते घेणाऱ्या शिवसेनेला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५३ हजार मते मिळाली. पण, गेल्या चार वर्षांमध्ये आपणास संघटनात्मक बांधणीबाबत कोणतीही जबाबदारी देण्यात आली नसल्याची खंत कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे संदे माजी उपाध्यक्ष, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सोमवारी एका वृत्त वाहिनीशी बोलताना व्यक्त केली. आपण विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचेही ते म्हणाले.
*जनतेच्या प्रश्नावर सातत्याने
आवाज उठविला!*
पारकर म्हणाले, मी लढवय्या नेता असून जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवित आलो आहे. टोलवसुलीचा मुद्दा असो की सर्वसामान्य शिवसैनिकांवरील अन्याय, मी कधीच शांत न बसता रस्त्यावर उतरत राहिलो. वास्तविक शिवसेनेमध्ये घडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जिल्ह्यातही उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्याची गरज आहे. कारण येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पंचायती व त्यानंतर लोकसभा, विधानसभा या निवडणुकाही होणार आहेत. साहजिकच या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याची गरज आहे. परंतु, पक्षाचे वरिष्ठ नेते त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पारकर यांनी केला.
*शिवसैनिकांना न्याय
कसा देऊ?*
शिवसेनेत कोणतीही जबाबदारी दिली गेली नसली, तरी मी नाराज पारकर होऊन अन्य पक्षात प्रवेश करणार नाही. कारण, राज्यामध्ये सर्वच पक्षांची बिकट अवस्था आहे. पण, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने माझ्यावर जबाबदारी देण्याची वेळ आली आहे. कारण, केवळ ‘संदेश पारकर’ म्हणून मी शिवसैनिकांना किती वर्षे न्याय देत राहणार? असा सवालही पारकर यांनी केला.
*कणकवली मतदारसंघातून
विधानसभा लढविण्यास इच्छुक*
आपण कणकवली विधानसभा
मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे. कारण, या मतदारसंघाशी आपले वर्षानुवर्षे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अनेक वर्षे आपण नारायण राणेंविरोधात संघर्ष केला आहे, असेही पारकर म्हणाले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

