कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

पोईपला हॉटेल कामगाराचा नाल्यात पडून मृत्यू.

*🟥 पोईपला हॉटेल कामगाराचा नाल्यात पडून मृत्यू..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-०९:-* पोईप येथील एका हॉटेलात आचारी म्हणून काम करणाऱ्या मनोज प्रल्हाद मोरे (३६) यांचा मृतदेह विरण- पोईप सीमेवरील नाल्यात शनिवारी सकाळी आढळून आला. याबाबत पोलीस पाटील निनाद माडिये यांनी मसुरे पोलीस दूरक्षेत्राला खबर दिली. मनोज मोरे हा तरुण दीड महिन्यापूर्वी पोईप येथील हॉटेल वर्दम अॅण्ड स्वीट मार्ट येथे कामाला आला होता. वर्दम यांच्या नातेवाईकांनी त्याला हॉटेलात कामाला ठेवले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मनोज मोरे हा दारू पिऊन आल्याने हॉ टेल मालक तुषार वर्दम यांनी त्याला कामावरून जा म्हणून सांगितले होते. तरी शनिवारी सकाळी लवकर उठून त्याने हॉटेलतील काही पदार्थही बनविले होते. त्यानंतर हॉटेल मालक वर्दम हे आपले हॉटेल घेऊन बिळवस यात्रेला गेल्यावर मनोज मोरे विरण परिसरातील दुकानातून काही खरेदी करून परत येत असता पोईप-विरण सीमेवरील नाल्यात तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला. दहा
फूट नाल्यावरून पडल्याने व दारुच्या नशेत असल्याने त्याला पाणी कमी असूनही उठता आले नाही. परिणामी, पाण्यात गुदमरून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
जिल्ह्यात त्याचे कोणीही नातेवाईक नसल्याने त्याच्याकडील आधारकार्डवरील पत्त्यामुळे त्याच्या मुंबई येथील नातेवाईकांशी संपर्क झाला. ही घटना समजताच मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, हेड कॉन्स्टेबल राजन पाटील, सुहास पांचाळ, प्रमोद नाईक, कॉन्स्टेबल सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. परंतु सदर कामगाराचे नातेवाईक उपस्थित नसल्याने पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करून मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
यावेळी पोलीस पाटील महेश परब, निनाद माहिये, उपसरपंच कलाथर कुरो, पंकज वर्दम, दिलीप कांदळकर, सिद्धेश माइये, रवींद्र कुशे, गोपीनाथ पालव, विजय पालव यांनी पोलिसांना सहकार्य केले.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!