सावंतवाडी भाजपा कार्यकर्त्यांची वीज वितरण कार्यालयाला धडक..

 

वीज बिलाच्या सवलतीसाठी अभियंत्यांना देण्यात आले निवेदन.

प्रतिनिधी प्रशांत मोरजकर

सावंतवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी वाढीव वीज बिलात सवलत द्यावी यासाठी सावंतवाडी येथील वीज कार्यालयावर मोर्चा काढून महा विकास आघाडी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी निवेदनाद्वारे अधीक्षक अभियंता यांना वीजबिलात सवलत द्यावी तसेच वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांवर जबरदस्ती करू नये अशा प्रकारची मागणी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक परीमल नाईक, आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, राजू बेग, मोहिनी मडगावकर ,परिनीती वर्तक, दिपाली भालेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!