कोकणसामाजिकसिंधुदुर्ग

अनिल शिंगाडे यांना दिव्यांग सेवा पुरस्कार प्रदान*

*अनिल शिंगाडे यांना दिव्यांग सेवा पुरस्कार प्रदान*

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

*सिंधुदुर्ग*

साईकृपा अपंग संस्थेचे अध्यक्ष अनिल शामु शिंगाडे कसाल , तालुका .कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग यांना वयाच्या ११ व्या वर्षी टायफर तापाने अंधत्व आले अनिल शिंगाडे हे ऐका गरीब कुटुंबात जन्मलेले असुनही अशा परीस्थितीत त्यांनी मुंबई, पुणे येथे आई-वडिलांन पासुन दूर राहून आपले शिक्षण पुर्ण केले अनिल शिंगाडे यांनी सिंधूदूर्ग जिल्हयातील दिव्यांग बांधवांच्या सेवेचा वसा हाती घेत त्यांनी त्यात स्वताला झोकून देवुन काम केले आहे अनिल शिंगाडे यांना यांच्या कामाबद्दल १५ पुरस्कार मिळाले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेवुन नुकताच त्यांना हूतात्मा अपंग बहुउद्देशिय विकास कल्याणकारी संस्था कराड या संस्थेने दिव्यांग सेवा पुरस्कार देवुन गौरव केला हा पुरस्कार सोहळा ओरोस रवळनाथ मंदिर येथे पार पडला त्या बद्दल सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!