कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

अंगणवाडी मदतनीस पदासाठी ११ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अंगणवाडी मदतनीस पदासाठी ११ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

दोडामार्ग तालुकाअंतर्गत तळेखोल, तळकट, कोनाळ अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी मदतनीस पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून ११ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी तारका बाळाजी साटम यांनी दिली. २७ जून ते ११ जुलैपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालय दोडामार्ग दूरध्वनी क्र. ०२३६३-२५६५०६, ९४२१०२९५५६ येथे संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!