कोकणक्राइममहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

अश्लील फोटो प्रसारित केल्याच्या आरोपातून निर्दोष

अश्लील फोटो प्रसारित केल्याच्या आरोपातून निर्दोष

मालवण

इन्स्टाग्रामवर युवतीचा अश्लील फोटो बनवून त्याची स्टोरी प्रसारित करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तुकाराम भीमराव सूर्यवंशी (२२, रा. धावडेवस्ती, भोसरी पुणे) याची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा सहदिवाणी न्यायाधीश यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. स्वरुप नारायण पई यांनी काम पाहिले.

याबाबत १३ मार्च २०२२ रोजी मालवण पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५४ ड, ५०० व माहिती व

तंत्रज्ञान (सुधारित) अधिनियम ६७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीविरुद्ध तपासकाम करून येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याकामी सरकार पक्षातर्फे एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तिवाद, फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती विचारात घेऊन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा सहदिवाणी न्यायाधीश यांनी आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!