कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

डॉ.जुई निगुडकर दिल्लीत सन्मानित

डॉ.जुई निगुडकर दिल्लीत सन्मानित

सिंधुदुर्ग

पी. जी. नीट परीक्षेत देशभरातील तब्बल २ लाख ८० हजार विद्यार्थ्यांमधून ७ वा क्रमांक प्राप्त केलेल्या सिंधुदुर्गच्या सुकन्या डॉ. जुई निगुडकर यांना नवी दिल्ली येथील एका समारंभात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. बाघेल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. केंद्रीय आरोग्य खात्याच्या ‘नॅशनल बोर्ड फॉर एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स’ या संस्थेतर्फे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या परीक्षेत पहिल्या २५ क्रमांकात आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

नॅशनल बोर्ड फॉर एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स’ म्हणजेच एन. बी. ए. एम. ही संस्था देशभरातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्व परीक्षांचे नियोजन व नियंत्रण करते. या संस्थेतर्फे पी. जी. नीट परीक्षेतील टॉपर्स आणि डेंटल म्हणजे एम. डी. एस. परीक्षेतं प्रथम तीन क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम • आयोजित करण्यात आला होता. दिल्ली येथील एन. बी. ए. एम. भवन येथे हा कार्यक्रम झाला. या भव्य कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्गच्या डॉ. जुई निगुडकर यांना ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ आणि विशेष स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!