कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

जिल्ह्यात सर्वच भागात दमदार पाऊस

जिल्ह्यात सर्वच भागात दमदार पाऊस

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गुरुवारी जिल्ह्याच्या सर्वच भागात दमदार पाऊस कोसळला. त्यात एकादशी असल्याने पावसाचा जोर अधिकच वाढला होता. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक ८०.५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ६२.५ मि. मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी ३९१.२ मि. मी. पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड – ७३.८ (३६९.५), मालवण – ५८.३ (४०२.७), सावंतवाडी – ६९.९ (४९५.३), वेंगुर्ला – ८०.५ (३६५.२), कणकवली – ४८.१ (३३२.४), कुडाळ – ५१.७ (३९५.०), वैभववाडी ४२.३ (३३८.५), दोडामार्ग – ६७.३ (४२८.१) असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!