कणकवलीमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

काही जादा रेल्वे गाड्यांच्या स्थानक, वेळांमध्ये बदल 

काही जादा रेल्वे गाड्यांच्या स्थानक, वेळांमध्ये बदल

कणकवली

रेल्वे प्रशासनातर्फे गणेशोत्सव कालावधीसाठी २६ जूनला जादा गाड्यांची घोषणा केली आहे. यातील तीन गाड्यांना अधिक थांबे व काही स्थानकावरील वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. गणेशभक्त रेल्वेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये, यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली. १३ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत धावणारी सीएसएमटी – सावंतवाडी – एसएसएमटी डेली गाडीला पेण स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. सीएसएमटी – सावंतवाडी (०११७१) रात्री २.५० वाजता आणि सावंतवाडी – सीएसएमटी (०११७२) रात्री १२.५८ वाजता पेण येथे पोहोचणार आहे. तर सीएसएमटी – सावंतवाडी (०११७२) पहाटे ३.३५ वा. सावंतवाडी (यापूर्वीची वेळ ४.३५) येथे पोहोचणार आहे. मडगाव-सीएसएमटी डेली स्पेशल (०११५२) या गाडीच्या काही स्थानकांवरील वेळेतही बदल करण्यात आला आहे. यात गाडी रोहा दुपारी २.५०, पनवेल दुपारी ३.५५, दादर सायंकाळी ५.१५ व सीएसएमटी येथे सायंकाळी ५.४५ वा. पोहोचेल. त्याशिवाय दिवा- रत्नागिरी-दिवा (०११५३/००११५४) या गाडीलाही पनवेल व पेण येथे थांबा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!