चोरीच्या दुचाकीचा काही तासातच शोध
चोरीच्या दुचाकीचा काही तासातच शोध
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथे पाच दिवसांपूर्वी पार्क करून ठेवलेल्या दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसांनी अवघ्या तीन तासात तपास करून वेर्ले- तळीवाडी येथील विनोद मधुकर राऊळ (२८) याला अटक केली. या प्रकरणी तक्रारदार गजानन रघुनाथ वाडकर (रा. सावंतवाडी) यांनी १८ जूनला सकाळी आपली हिरो होंडा कंपनीची एव्हिएटर दुचाकी उभाबाजार येथे जुन्या घराजवळ पार्क करून दुसऱ्या वाहनाने गोवा येथे गेले होते. गोवा येथून सायंकाळी आल्यावर त्यांना दुचाकी आढळली नाही. या प्रकरणी २६ रोजी तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, उपनिरीक्षक सूरज पाटील व पोलीस हवालदार संतोष गलोले यांनी रविवारी मध्यरात्री वेर्ले येथून संशयित विनोद राऊळ याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याचा चार वर्षांपूर्वी एका चोरीच्या गुन्ह्यात सहभाग होता. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपीचे वकील स्वप्नील कोलगावकर यांनी जामिनासाठी अर्ज केला. अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.
