अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा
अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा
वेंगुर्ले
अल्पवयीन मुलीला एका युवकाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या भावाने वेंगुर्ले पोलिसांत दिली आहे. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे. राधानगरी-भैरीबांबर येथील युवकाने सदर युवतीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विठ्ठल उर्फ बंड्या धुरी करत आहेत.
