न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसालच्या दोन विद्यार्थ्यांनी एच एस सी परीक्षेमध्ये बोर्डात प्रथम
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसालच्या दोन विद्यार्थ्यांनी एच एस सी परीक्षेमध्ये बोर्डात प्रथम*
*प्रतिनिधी सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्ग*
एच एस सी परीक्षा फेब्रुवारी २०२३ मध्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसालच्या कु.रसिका राजेंद्र गावडे व कु.मयुरी झिलू जंगले या दोन्ही विद्यार्थिनींनी १०० पैकी ९८ गुण प्राप्त करून कोकण विभागीय बोर्डामध्ये प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था, कसाल संस्थेचे अध्यक्ष श्री आनंद सावंत शाळा समिती अध्यक्ष श्री नवीन बांदेकर सचिव श्री यशवंत परब यांनी अभिनंदन केले. तसेच दशक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदन व समाधान व्यक्त केले जात आहे.

