कोकणक्राइममहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न, निर्दोष मुक्तता

पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न, निर्दोष मुक्तता

वेंगुर्ले

दारुची वाहतूक करताना पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून भोयाचे केरवडे येथील गौरव गिरीधर केरवडेकर याची ओरोस येथील सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयितातर्फे अॅड. के. डी. वारंग यांनी काम पाहिले. स्थानिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग यांना २८ मे २०१७ रोजी विश्वनाथ उर्फ मनोज चंद्रकांत वालावलकर (रा. आंदुर्ले) व गौरव गिरीधर केरवडेकर (रा. भोयाचे केरवडे) हे गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करीत असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परुळे बाजार येथे नाकाबंदी केली. त्यावेळी आरोपी हे पांढऱ्या रंगाची मारुती अल्टो कार घेऊन तेथे आले. कार थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी पोलीस निरीक्षक बापू खरात आणि अन्य पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी निवती पोलीस ठाणे येथे दोषारोप पत्र दाखल केले होते. यातील पहिला आरोपी विश्वनाथ चंद्रकांत वालावलकर याचे निधन झाले. तर न्यायालयाने गौरव केरवडेकर याची निर्दोष मुक्तता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!