कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीय

एसटी बँक निवडणुकीसाठी सिंधुदुर्गात ८ ८ टक्के मतदान

एसटी बँक निवडणुकीसाठी
सिंधुदुर्गात ८ ८ टक्के मतदान

कणकवली

महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेच्या संचालकपदासाठी सिंधुदुर्गमध्ये सर्व आगार पातळीवर शुक्रवारी मतदान झाले. एकूण १९ संचालक निवडून देण्यासाठी राज्यभरात ६३ हजार मतदार आहेत. यात सिंधुदुर्गमध्ये ८७.५९ टक्के मतदान झाले. सिंधुदुर्गात १५०८ मतदार असून सुमारे १३२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या २० वर्षांपासून या बँकेवर एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे.

या संचालकपदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण सात पॅनेल आहेत. यात एसटी कामगार संघटना, शिवाई पॅनेल, शिंदे गट, गुणरत्न सदावर्ते, गोपीनाथ पडळकर, इंटक व अपक्ष अशा पॅनेलचा समावेश आहे. यात सर्वसाधारण

प्रवर्गातील १४. महिला दोन, एसटीएनटी, ओबीसी व एससी प्रत्येकी एक अशा १९ जागांचा समावेश आहे. शुक्रवारी सर्व डेपोंमध्ये मतदान प्रक्रिया झाली. कणकवली येथे विभागीय कार्यशाळा व डेपो मिळून ४६८ मतदार होते. यापैकी ४१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १९ जागांसाठी सात पॅनलचे मिळून सुमारे १४३ उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणी २५ जून रोजी मुंबई येथे होणार आहे. गेल्या २० वर्षांपासून या बँकेवर एसटी कामगार संघटनेचे वर्चस्व आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सचिव हनुमंत ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झाली. यावेळी एसटी कामगार संघटनेला निर्विवाद यश मिळवेल, असा विश्वास संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप साटम यांनी व्यक्त केला,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!