माडखोल ग्रामविकास अधिकाऱ्यांना धमकी
माडखोल ग्रामविकास अधिकाऱ्यांना धमकी
सावंतवाडी
माडखोल ग्रामपंचायतीत घुसून शासकीय कामात अडथळा आणत ग्रामस्थ विजय प्रभाकर कारिवडेकर व त्यांची पत्नी विजया विजय कारिवडेकर यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ग्रामविकास अधिकारी एस. के. राऊळ यांनी दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात राऊळ यांनी तक्रार दिली. या तक्रारीनुसार पती-पत्नीविरोधात शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. माडखोल ग्रामविकास अधिकारी राऊळ यांना एप्रिल महिन्यात अशाच प्रकारे या दांपत्याने ग्रामपंचायतीत येऊन धमकी दिली होती. मात्र, या धमकीकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. घरकुल योजनेच्या प्रस्तावाबाबत शुक्रवारी दुपारच्या सुमारास दांपत्य ग्रामपंचायतीत आले. त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जात ‘आमचे काम करत नसाल तर तुम्हाला जीवे ठार मारू’, अशी धमकी दिली. या दोघांपासून आपल्याला धोका आहे, अशी फिर्याद ग्रामविकास अधिकारी राऊळ यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी दांपत्याविरोधात गुन्हा दाखल केला.
