नवोदय विद्यालयाची निवड यादी जाहीर
नवोदय विद्यालयाची निवड यादी जाहीर
सावंतवाडी
मानव संसाधन विकास मंत्रालय, शिक्षा विभाग भारत सरकारद्वारे संचलित सांगेली-सावरवाड जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहावी निवड चाचणीसाठी ८० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता या चाचणीत किती स्थानिक आणि किती परजिल्ह्यातील हे स्पष्ट होणार आहे. नवोदय विद्यालय सहावी इयत्तेसाठी निवड चाचणीसाठी परजिल्ह्यातील मुलांना बसविण्यात येत. यावरून दरवर्षीच वादंग होतो. जिल्ह्यातील काही शाळांमध्ये परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांना या परीक्षेला बसविले जाते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांमध्ये असंतोषाची भावना आहे. त्यावरून अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. तर या प्रश्नावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीनेही आंदोलन छेडण्यात आले होते. परजिल्ह्यातील विद्यार्थी गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये नावाला प्रवेश घेऊन त्यांना नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेला बसविल्यास विरोध करण्यात आला होता. स्थानिकांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेत काही विद्यार्थी प्रवेशातून वगळण्यात आले होते. आता यंदाची सहावी निवड चाचणीचा निकाल जाहीर झाल्याने त्यात स्थानिकांना किती स्थान आहे, ते स्पष्ट होणार आहे. त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरणार आहे…
