तुळस येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
तुळस येथील तरुणाची
गळफास घेऊन आत्महत्या
वेंगुर्ले
तुळस-रेवटीवाडी येथील रहिवासी लाभेश चंद्रकांत भगत (२९) याने शुक्रवारी २३ जून रोजी सकाळी १० ते ११ वा. च्या सुमारास तुळस रेवटीवाडी येथील लिंगडीचे टेंब या ठिकाणी आंब्याच्या झाडास गळफास घेत आत्महत्या केली. या बाबतची खबर मयताचे काका दिगंबर शांताराम भगत यांनी वेंगुर्ले पोलीस स्थानकात दिली. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करुन तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत वेंगुर्ले पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार गजेंद्र भिसे हे करीत आहेत. लाभेश हा गोवा येथे कामाला होता.. मागील सात महिन्यापासून त्याची मानसिक स्थिती बिघडली होती. त्याच्या पश्चात वडील, भाऊ, काका, चुलत भाऊ असा परिवार आहे.

