अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी
अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी
कुडाळ, ता. २४ : अज्ञात वाहनाची धडक बसल्यामुळे वेताळ- बांबर्डे तेलीवाडी येथे एक पादचारी महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडला. तिला अधिक उपचारासाठी ओरस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित महिलेची ओळख पटू शकलेली नाही. यावेळी स्थानिक ग्रामस्थ दिनेश शिरवलकर, विराज शिरवलकर यांनी पोलिस यंत्रणा तसेच रुग्णवाहिका बोलवून महिलेला अधिक उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.

