क्राइममहाराष्ट्रसांगली

सा़गलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या

सा़गलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या

सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 100 फुटी वरील माने चौक परिसरात काल रात्री अज्ञातांनी नालसाब मुल्ला याच्यावर हल्ला करत धारदार हत्याराने आणि गोळ्या घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांसह पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली हे घटनास्थळी हजर झाले असून तपासात सुरुवात करण्यात आली आहे.
नालसाब मुल्ला सध्या राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मात्र नालसा मुल्ला यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे.. त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास नालसाब मुल्ला हे आपल्या शंभर फुटी नजीकच्या घराबाहेर निवांत बसले होते.
यावेळी चार अज्ञात इसम त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी मुल्ला यांच्याशी बाचाबाची सुरू केली. त्यामुळे मुल्ला यांनीही या अज्ञातांना झापण्यास सुरुवात केली. त्यावेळी या अज्ञातांनी मुल्ला यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर एकामागून एक आठ राऊंड फायर केले. तसेच धारदार शस्त्राने डोक्यावर वार केले. त्यामुळे मुल्ला हे गंभीर जखमी झाले.
त्यामुळे मुल्ला यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ मुल्ला यांच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात केला. पूर्व वैमन्यस्यातून ही हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या हत्येमागचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र गोळीबाराच्या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!