आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 चौकुळ गावात प्राथमिक शिक्षकांची अनेक पदे रिक्त…., यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर जबाबदार असल्याचा उद्धव ठाकरे गटाचा आरोप…..*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि १८ जून.:*
चौकुळ येथील चिखलव्हाळ बेरडकी व गोणसाटवाडी या दोन्ही शाळांमध्ये शिक्षक नसल्याने मुलांना शिकवायचे कोणी? हा प्रश्न पालकांसमोर पडला आहे. शिक्षण मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्याच मतदारसंघातील अनेक शाळांमध्ये आज प्राथमिक शिक्षकांची कमतरता भासत आहे. कोणत्याही नियोजनाशिवाय मोठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षकांची जिल्हा बदली केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकच उपलब्ध नाहीत. ज्या शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी स्वयंसेवक नेमून त्यांच्याकडून शिक्षकाचे काम करून घेण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मात्र प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत स्वतःच्या जिल्ह्यात शिक्षण मंत्र्यांकडून होत असलेला हलगर्जीपणा पाहून अनेक पालकांनी आपले नाराजी व्यक्त केली आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चौकुळ येथील शाखाप्रमुख रुपेश गावडे यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना अनेक समस्यांवर आपली नाराजी व्यक्त केली. स्वतःच्या जिल्ह्यातील मुलांच्या भविष्याबाबत शिक्षण मंत्री जर असे उदासिन असतील तर महाराष्ट्रातील इतर शिक्षणाची काय परिस्थिती असेल ? चौकुळ संपूर्ण गावात पहिली ते पाचवी व पहिली ते सातवी अशा एकूण नऊ शाळा आहेत चौकुळ एक नंबर शाळेमध्ये पहिली ते सातवी मध्ये ४० ते ४५ मुले आहेत. मात्र केवळ दोन शिक्षकावर या संपूर्ण मुलांची जबाबदारी सोपवलेली आहे. इतर प्रत्येक शाळेत केवळ एक शिक्षक आहे तर चिखलव्हाळ बेरडकी व गोणसाडवाडी या ठिकाणी शिक्षकच उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षण मंत्री असणाऱ्या दीपक केसरकर हे चौकुळ ला आपले हक्काचे गाव संबोधतात मात्र तेथील मूलभूत सुविधा देखील ते पुरवू शकत नाही त्यामुळे भविष्यात चौकुळ येथे दीपक केसरकर यांनी मतदारांकडे मते मागण्यासाठी अजिबात येऊ नये.अशी टीका देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!