ठाणेमहाराष्ट्रराजकीय

🟥 कळवा येथील कार्यक्रमात ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ पाटील यांच्यावर शाईफेक

 

*🟥 माझ्या विरोधात ट्रॅप होता : अयोध्या पौळ पाटील यांचा आरोप*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ठाणे, दि-१७:-* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ या ठिकाणी शाईफेक करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. कळव्यातील मनिषा नगर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त एक खासगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या खासगी कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांनाही बोलवण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली.

*अयोध्या पौळ पाटील यांचं ट्वीट काय?*

मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होत असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा #शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन लाखो शिवसैनिक माझ्या सोबत होता. लढण्याची ताकद तुम्ही दिली सर्वांनी.

एक एक करुन व्हिडिओ समोर येत आहेत ते सोशल मीडियावर शेअर करेनच आणि घडलेला प्रकार तुम्हा सर्वांच्या पुढे मांडेन. असं म्हणत अयोध्या पौळ पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

*नेमकी काय घडली घटना?*

ठाकरे गटाच्या समाजमाध्यम राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर ठाण्याजवळील कळवा भागात शाईफेक झाल्याचा प्रकार शुक्रवार रात्री उघडकीस आला. काही महिलांनी ही शाई फेक केली असून या प्रकरणाची नोंद करण्याची प्रक्रिया कळवा पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत सुरू होती. ठाकरे गटाच्या समाजमाध्यम राज्य समन्वयक अयोध्या पौळ या ट्विटर या माध्यमातून विरोधकांवर टीका करत असतात. शुक्रवारी खासगी कार्यक्रम कळवा येथील जय भीम नगर परिसरात आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी अयोध्या या आल्या होत्या. त्यावेळी काही महिलांनी त्यांना घेरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर शाईफेक केली. या प्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात येत असून पोलीस महिलांनाचा शोध घेत आहेत.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!