महाराष्ट्रराजकीय

🟥 “…तर १९९६ सालीच शरद पवार पंतप्रधान झाले असते,” प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा

 

*🟥 “देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की…”*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मुंबई, दि-१७:-* राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सातत्याने होत असते. पण, शरद पवार यांनी वेळोवेळी याला नकार दिला आहे. अशातच काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे. “एच. डी. देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. ते ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्ट्या’वर बोलत होते.

 

“मला एका गोष्टीची खंत आहे. ही खंत शरद पवार यांनाही आहे. १९९६ साली देवगौडा यांचा पाठिंबा काँग्रेसच्यावतीने सीताराम केसरी यांनी काढून घेतला. तेव्हा काँग्रेस अंतर्गत जे वातावरण होतं, त्यामुळे १०१ टक्के सर्व लोक शरद पवारांच्या पाठिशी उभे होते. त्यावेळी शरद पवार ठाम राहिले असते, तर देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवारच देशाचे पंतप्रधान झाले असते,” असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

 

“तेव्हा आम्ही कुठेतरी कमी पडलो. लोकसभा निवडणुकीनंतर ११ महिन्यानंतर केसरी यांनी देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी काँग्रेसची परिस्थितीही चांगली नव्हती. १४५ खासदार होते. तर, शरद पवार संसदीय नेते होते. देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, निवडणूक लागण्याची शक्यता होती,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

 

“लोकसभा निवडणुकीच्या ११ महिन्यानंतर कोणत्या खासदाराला लगेच निवडणूक परवडणार होती? अचानक निवडणुकीला सामोरे गेल्यावर खासदार आणि पक्ष निवडून येईल का? याबाबत साशंकता होती. सीताराम केसरी यांनी अचानक पाठिंबा काढून घेतला. कारण, केसरी यांना वाटलं होतं, ते स्वत: पंतप्रधान होतील,” असेही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटल आहे

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!