कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा ग्रामपंचायत सदस्य श्री रत्नाकर आगलावे यांच्या शिष्टमंडळाने दिली धडक राष्ट्रीय महामार्ग उप अभियंता कार्यालयावर

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴बांदा, दि-१६:-* कालपासूनच शाळा कॉलेजेस सुरू झाले असून बांदा येथे गॅस पाईपलाईनसाठी करण्यात आलेले खुदाई वाहनांना अडथळे रस्ता बंद या संदर्भात बांदा ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता, सावंतवाडी यांच्या कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र गॅस पाईपलाईनचे खोदाई करून पाईपलाईन टाकण्याचे काम बांदा ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुरू आहे. रस्ते वाहतूक, शालेय विद्यार्थी तसेच दूरसंचार विभागाला या खोदाईमुळे अडचणी निर्माण झाले आहे. बांदा येथे सध्या काम अंतिम टप्प्यात आलेले असून सदर ठेकेदाराने प्रस्तावित उड्डाणपूल कट्टा कॉर्नर बांदा येथील आपल्या मालकीचा कायम वर्दळीच्या ठिकाणी असणारा साईड रोड मध्यभागी खोदून वाहतुकीस अडथळा व अपघात निमंत्रण परिस्थिती निर्माण केलेली आहे. संबंधित रस्त्याची मालकी राष्ट्रीय महामार्गाजवळ असून सर्वसामान्य लोकांना या संदर्भात अनेक प्रश्न पडलेले आहेत. त्याची उत्तरे मिळावी असे निवेदन ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे यांनी दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे सदरचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या मालकीचा असताना आपला कोणताही शासकीय अधिकारी तिथे हजर का नाही? भविष्यात प्रास्तावित उड्डाणपूल सदर कामामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा अगर आराखड्यात बदल करायचा झाल्यास त्या जबाबदार कोण? 15 मे पर्यंत रस्ता खोदाई व काम करण्यास शासन मान्यता असताना जून महिन्यात सदर कामास पावसात परवानगी कोणी दिली. सदर काम करण्यास जर आपण परवानगी दिली तर काम किती कालावधीत पूर्ण होणार व सदर कामामुळे झालेल्या रस्ता नुकसानी जबाबदार कोण असे अशा अनेक प्रश्नांना संदर्भात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग उपअभियंताचे शाखा अभियंता आर. कांबळी यांना निवेदन दिले. व सदर रस्ता दुरुस्ती व वाहतुकीस लवकरात लवकर पूर्ण करण्यात आले नाही.,तर गॅस पाईपलाईनचे जॉईंट मारायला देणार नाही. असा आक्रमक पवित्रा सामाजिक कार्यकर्ते हेमंत दाभोळकर,गुरु कल्याणकर व गुरुदास गवंडे यांनी घेतला. सदर रस्ता लवकरात लवकर पीसीसी करून पूर्ण करण्यात यावा असेही यावेळी शाखा अभियंता सांगण्यात आलं. शाखा अभियंत्यानी त्वरीत रस्ता दुरुस्तीचे व वाहतुकीस खुले करण्याचे आदेश देणार असल्याचे सांगितले. व त्यापद्धतीने संबंधित ठेकेदार तसेच MNGL च्या अधिकाय्रांना दुरध्वनीवरुन सुचनावजा आदेश देखील दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हेमंत दाभोलकर, गुरु कल्याणकर, शुभम कवठणकर, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, गजानन डेगवेकर आदी उपस्थित होते.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!