शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

वनविभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे आंबोली बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य..

▪️ एस्.टी. महामंडळाने सुरू केलेल्या कामात वनविभागाने घेतली हरकत..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : केशव जाधव-चौडू पाटील

🎴आंबोली,दि.३०: येथील बस स्थानकात पावसाळ्यात होणाऱ्या पाण्याचा योग्य रीतीने निचरा होत नसल्याने येथील परिसर जलमय होतो. यावर महामंडळाचे आगार व्यवस्थापक यांनी पाईप घालून पाणी तिसरा करण्याचे ठरविले. मात्र, याला वनविभागाने आक्षेप घेतल्याने गेली दोन वर्षे या ठिकाणी आठ सिमेंट पाईप पडून आहेत. वनविभागाच्या आडमुठ्या धोरणाचा प्रवासी वर्गातून निषेध केला जात आहे

प्रति महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोली या थंड हवेच्या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देऊन जातात. अशा ह्या नावाजलेल्या आंबोली या पर्यटन स्थळांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटचे आंबोली हे बस स्थानक असून तेथे पावसाळ्यात पाण्याचे डबके साचून या परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. यावर उपाय योजना म्हणून सावंतवाडी बस स्थानकाचे प्रमुख यांनी पाण्याचा निचरा व्हावा म्हणून आठ सिमेंटचे मोठे पाईप एकाबाजूला चर मारून पाणी जाण्यासाठी व्यवस्था केली असता त्या ठिकाणी चर मारण्यास वनविभागाचे अधिकारी यांनी अडथळा करुन ते काम बंद पाडून सदर काम करण्यास मज्जाव केला.

त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात बस स्थानक परिसर हा जलमय होतो. तसेच सदर बसस्थानक हे जनतेच्या सोयीसाठी असून बसस्थानकामध्ये प्रवासी म्हणून  आबाल बुद्ध व विकलांग व्यक्तींचा वावर असतो. या  परिसरात पाणी साचल्यामुळे अबालवृद्धांना व विकलांग नाहक त्रास सोसावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाने पाण्याचा निचरा होण्यासाठी आठ पाईपांची व्यवस्था केली होती. परंतु जन सेवेसाठी तत्पर असलेल्या एस.टी. महामंडळाच्या रस्त्यावर पाईप टाकण्यास वनविभागाने मनाई केली व आपले आडमुठे धोरण अवलंबले. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना पावसाच्या दिवसात त्रास सहन करावा लागतो.

बस स्थानक हे महाम़डळाचे  असून वन विभाग हेही शासनाचे आहे. असे असताना जनतेच्या सेवेसाठी हे शासन एकमेकांना सहकार्य करताना दिसत नाही. उलट हे  वनविभाग आपल्या हक्काच्या जमिनीत म्हणजेच वनविभागाचे जमिनीत वैयक्तिक स्टॉल किंवा घर बांधताना विरोध करताना दिसत नाहीत. मात्र, जनतेच्या हिताच्या गोष्टींना जाणीवपूर्वक विरोध करून सदर काम बंद पडतात. यामागे काय गौड बंगाल आहे, हे कळत नाही. तेव्हा त्याची चौकशी होऊन हे धूळखात पडलेले पाईप पाण्याचा निचरा घालवण्यासाठी त्याठिकाणी विरोध न करता स्वतःहून सहकार्य करावे आणि हा प्रश्न मार्गी लावावा अशी आम जनतेचे मागणी आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!