कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥शासनाने आंबा नुकसान भरपाई द्यावी!

🟥जिल्हा आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांची मागणी

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले, दि.१२:* सन २०२२-२३ च्या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदर नुकसानीचे शासनाने तात्काळ पंचनामे करुन आंबा नुकसान भरपाई देण्यात यावी, नाही. अशी मागणी आंबा-काजू उत्पादक बागायतदार संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

चालू वर्षी हवामानात सातत्याने झालेल्या बदलामुळे आंबा पिकावर किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. बाजारात उपलब्ध असलेली महागडी कीटकनाशके वापरुनही कीटकावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. सबब ही कीटकनाशके निष्क्रिय ठरली. या कीटकनाशकांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला तो वाया गेला. अजूनही सकाळचे तापमान २० ते ३१ अंश से. इतके राहत असून या सर्वांचा आंबा पिकावर विपरित परिणाम झाला असून चालू हंगामात आंबा पिकाचे

 

उत्पादन १० टक्के पेक्षाही कमी रहाणार आहे. त्याचप्रमाणे मागील २ महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे आंबा फळावर चट्टे पडले आहेत. अशा मालाचे प्रमाण एकूण उत्पन्नाच्या सुमारे ३० ते ४० टक्के इतके आहे, अशा मालाची बाजरपेठामध्ये विक्री होणार

 

जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या औषधांचा खर्चही येणाऱ्या उत्पन्नातून भरुन येणार नाही. शेतकऱ्यांनी खते व औषधांसाठी केलेला खर्च तसेच राष्ट्रीयकृत बँकाकडून तसेच सहकारी बँकांकडून घेतलेले कर्जही परत फेड करणे यंदा शक्य होणार नाही. औषधाचे व्यापारी तसेच बँकाकडून रकमेच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जात आहे. कोकणातील शेतकऱ्यांवर प्रथमच उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने आंबा नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आंबा नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेंगुर्ले दौऱ्यावर आले असता जयप्रकाश चमणकर शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन केली आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!