कुडाळकृषिकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 पाणथळ जागेत बांबू लागवडीचा यशस्वी प्रयोग

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-०१:-* दलदलीची जागा नापीक समजली जाते मात्र कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील संतोष दत्ताराम खोत या शेतकऱ्याने तेथील १५ गुंठे पाणथळ क्षेत्रात बांबूच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. यंदाच्या जानेवारीमध्ये या बांबू लागवडीला एक वर्ष पूर्ण होत असून आणखी तीन वर्षांनी या बांबू पासून दोन लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. पाणथळ जागा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या असल्या तरी यात जलोय वनस्पती खेरीज अन्य कुठल्याही वनस्पतीची लागवड यशस्वी होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पाणथळ जागा वर्षानुवर्ष पडीक राहिले आहेत. मात्र पडीक असलेली पाणथळ जागा देखील लागवडीखाली आणता येऊ शकते हे रानबांबुळी येथील संतोष खोत यांनी दाखवून दिले आहे. दलदलीच्या प्रदेशात बांबू लागवड यशस्वी होत नाही मात्र ओलिताखाली बांबू कोरडाहू क्षेत्रापेक्षा दीडपट उत्पन्न देतो आणि सर्व बांबूंच्या कोंबांचे बांबूत रूपांतर होते .ही बाब हेरून संतोष खोत यांनी पाणथळ असलेल्या क्षेत्रातील पंधरा गुंठे जागेत माडाला अळी करतात असे मातीचे भराव टाकून गोल उंचवटे तयार केले या भराव टाकलेले जागेमध्ये माणगा बांबूच्या १०० कंदांची लागवड जानेवारी २०२१ मध्ये केली वर्षभरात १५ फूट उंचीपर्यंत हे कंद वाढले आहेत . आणखी ३ वर्षानंतर हे बांबू कापणीसाठी तयार होऊन १५ गुंठे क्षेत्रातून २ लाख रुपये उत्पन्न मिळेल बांबू लागवडी बरोबरच खोत यांनी नारळ सुपारीच्या बागेत काळी मिरी लागवडीचाही यशस्वी प्रयोग केला आहे. जंगली झाडे आणि घरालगतच्या सिमेंट खांबांला जाळी बांधून मिरी लागवड केली आहे. याशिवाय विविध प्रकारचा भाजीपाला लागवड करून शेतीमधून आर्थिक समृद्धी येऊन शकते याचा आदर्श खोत यांनी घालून दिला आहे .भाजीपाला विविध फळ पिकांचे दर कमी जास्त होत असतात पण बाजारपेठेतील मागणीचा योग्य अंदाज आणि विक्री व्यवस्थापनाचे कौशल्य आत्मसात केले तर रोजगाराला वन वन भिरण्याची आवश्यकता नाही. शेती हेच शाश्वत उत्पन्नाचे साधन आहे असे आव्हानही संतोष खोत यांनी केले आहे.

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!