कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 अखेर युवासेनेचे तालुका संघटक संदेश राणे व उप तालुका संघटक संदेश वरक यांच्या मागणीला यश..

🟥 बांबर्डे, विजघर, खराडी भागातील नदीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात..

*🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-३१:– बांबर्डे, वीजघर,खराडी भागातील नद्या,नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळाचे संचयन झाले होते. मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान होत होते.
मात्र या वर्षी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवासेनेचे तालुका संघटक संदेश राणे व उपतालुका संघटक संदेश वरक यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांच्या कडे या भागातील नद्यांमधील गाळ काढण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे. अखेर हेवाळे, वीजघर,खराडी भागातील नदी व नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थां मधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!