वंदे भारत’ला कणकवलीत थांबा द्यावा
‘वंदे भारत’ला कणकवलीत थांबा द्यावा!
कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरून लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. या गाडीला कणकवली येथे थांबा देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचें कलमठ विभागप्रमुख प्रशांत वनस्कर यांनी कणकवली रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर श्री. चिपळूणकर यांच्याकडे प्रशासनाकडे देण्यास सुपूर्द केले.
निवेदनात म्हटले आहे की, कोकण रेल्वे मार्गावरून लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावणार असून या गाडीला कणकवली येथे थांबा देण्यात यावा. तसेच कणकवली रेल्वे स्थानकात स्वच्छतागृहाची सुविधा अपुरी असल्याने याठिकाणी नवीन स्वच्छतागृह उभारणे यावे. त्याचप्रमाणे कोकणकन्या व तुतारी एक्सप्रेसला महिला डबा जोडण्यात यावा. या मागण्यांची रेल्वे प्रशासनाने त्वरित पूर्तता करून सिंधुदुर्गवासियांना दिलासा द्यावा, अशी विनंती त्यांनी 4 त्यांनी केली आहे

